अकोला: शहरातील वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत संदेश पाठविण्यात येत आहेत. मात्र केवळ संदेश पाठवून नागरिकांना विश्वासात न घेता, पुरेशी माहिती न देता व प्रक्रिया स्पष्ट न करता मीटर बदलण्याची घाई सुरू असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे गटनेता व नगरसेवक निलेश देव यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, स्मार्ट तंत्रज्ञानाला विरोध नाही; पण नागरिकांच्या हक्कांवर अतिक्रमण करून, पारदर्शकता न ठेवता आणि उत्तरदायित्व टाळून कोणताही निर्णय अकोलेकरांवर लादला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हालमीटर बदलण्याचा आधार काय, उद्याचे बिल कसे येणार?, वेळेनुसार दर लागू होणार का?,बिल वाढल्यास दाद कुठे मागायची? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. नागरिकांना दोन दिवसांपासून ४८ तासांत स्मार्ट मिटर बसविण्यासंदर्भात मेसेज प्राप्त होत आहेत. कोणतीही परवानगी न घेता अशाप्रकारे मेसेज पाठवून मीटर बसविण्याला त्यांनी विरोध दर्शविला आहे. महावितरणने या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देण्याऐवजी केवळ ‘सहकार्य करा’ असे सांगणे योग्य नाही, असेही ते म्हणाले आहेत.
महावितरण प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात येत आहे की, नागरिकांना विश्वासात न घेता, दबाव टाकून किंवा अपुरी माहिती देऊन मीटर बदलण्याचे काम सुरू राहिल्यास वंचित बहुजन आघाडी जनतेसोबत लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारेल.
Ratnagiri Rain Update : कोकण किनारपट्टीवर कडकडीत ऊन! मुंबई वेधशाळेचा पुढील 3 दिवसांचा 'हा' अंदाज वाचून शेतकऱ्यांची धडधड वाढली, 2 हजार हेक्टरवरील पेरण्या संकटात या आहेत मागण्याप्रत्येक ग्राहकाला मीटर बदलण्याचे कारण लेखी स्वरूपात द्यावे.
मीटर बसविण्यापूर्वी अधिकृत कर्मचारी व कंत्राटदारांची माहिती जाहीर करावी.
जुन्या व नवीन मीटर रीडिंगची लेखी नोंद ग्राहकाला द्यावी.
स्मार्ट मीटरमुळे बिलिंगमध्ये काय बदल होणार याबाबत जनजागृती करावी.
नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा.
ग्राहकाकडून थेट किंवा अप्रत्यक्ष आर्थिक आकारणी होणार नाही याची हमी द्यावी.