'महावितरणची मनमानी कदापी सहन करणार नाही'; स्मार्ट मीटरविरोधात संतापाची लाट
Saam TV June 15, 2026 11:45 PM

स्मार्ट मीटरविरोधात बदलापुरात संतापाची लाट

महावितरणच्या कारभाराविरोधात संगीता चेंदवणकर, राम जगताप यांचं उपोषण

महावितरणची मनमानी सहन करणार नसल्याचा आंदोलकांचा इशारा

बदलापुरात सक्तीने लावण्यात येणाऱ्या स्मार्ट विरोधात संतापाची लाट उसळलीय. महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात बदलापुरातील सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर आणि राम जगताप यांनी उपोषण सुरू केलंय. स्मार्ट मीटरच्या नावाखाली बदलापुरातल्या जनतेला भरमसाठ बिलं पाठवण्यात येत आहेत. जनतेची अक्षरश: लूट सुरू आहे. प्रशासनाने स्मार्ट मीटरची सक्ती तत्काळ थांबवावी अन्यथा उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा राम जगताप यांनी दिलाय.

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांना मारहाण; अज्ञात व्यक्तीने कानशिलात लगावली, VIDEO

गेल्या काही महिन्यांपासून बदलापूरच्या जनतेत स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संताप दिसून येतोय. महावितरणचे कर्मचारी सक्तीने स्मार्ट मीटर लावत असून त्याचा परिणाम म्हणजे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं येत आहेत. याविरोधात निवेदनं देऊनही महावितरणने स्मार्ट मीटर लावण्याचा धडाका सुरूच ठेवलाय.

नवी मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची मोठी भेट! 28 किमीचा मेट्रो मार्ग अन् गायमुख ते भाईंदर नव्या पुलांना मंजुरी

महावितरणच्या याच मनमानीविरोधात सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर आणि राम जगताप यांनी एल्गार पुकारलाय. स्मार्ट मीटर म्हणजे लुटीचा खेळ असून, अदानींच्या कंपनीला फायदा करून देण्यासाठी महावितरणचे अधिकारी त्यांना साथ देत असल्याचा आरोप राम जगताप यांनी केलाय.

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

या मीटरमुळे भविष्यात वीजबिलांचा भार इतका वाढेल की सर्वसामान्य नागरिकांना घर कसं चालवायचं असा प्रश्न पडेल.त्यामुळे बदलापुरातल्याच नव्हे तर संपूर्ण राज्यातल्या जनतेनं रस्त्यावर उतरून या स्मार्टविरोधात आंदोलन छेडावं असं आवाहन राम जगताप यांनी केलंय.तर शासनाच्या धोरणानुसारच वीज मीटर बदलण्यात येत असून त्यामुळे कोणत्याही प्रकारे वाढीव वीज बिलं येत नसल्याचं स्पष्टीकरण महावितरणचे अधिकारी काटकर यांनी दिलंय.

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांना मारहाण; अज्ञात व्यक्तीने कानशिलात लगावली, VIDEO

धुळ्यात स्मार्ट मीटरविरोधात वातावरण तापलं

धुळे शहरामध्ये वीज वितरण विभागाच्या वतीने सुरू असलेल्या नवीन वीज मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध करण्यात आला आहे. या संदर्भात वीज वितरण अधिकाऱ्यांना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन नवीन मीटर बसविण्याच्या कामाला विरोध दर्शविलाय.

हायकोर्टाचे या संदर्भात नवीन मीटर न बसवण्यासंदर्भात आदेश दिलेले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात आदेश दिलेले असताना देखील, वीज वितरण विभागाच्या वतीने जबरदस्तीने नवीन मीटर बसविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.