Vaibhav Sooryavanshi Fight: वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. पण श्रीलंका दौऱ्यात अद्याप काही खास करता आलं नाही. तिन्ही सामन्यात त्याची खेळी सरासरी ठरली. असं असताना त्याच्या आक्रमक फलंदाजीकडे लक्ष असताना या श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्राय सीरिजमध्ये वेगळ्यात कारणाने चर्चेत आला आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी जल्लोष करणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंना भिडला. श्रीलंका ए संघाचे खेळाडू सामना जिंकल्यानंतर आक्रमकपणे जल्लोष करत होतो. त्याने वैभव सूर्यवंशीसमोरच जोरदार जयघोष केला. त्यामुळे वैभव सूर्यवंशीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने थेट श्रीलंकेच्या एका खेळाडूला धक्का दिला. त्या खेळाडूनेही प्रत्युत्तरात धक्काबुक्की केली. वाद वाढताना पाहून इतर खेळाडूंनी हे भांडण सोडवलं. पण आता वैभव सूर्यवंशीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात सामना सुरू असताना कर्णधार तिलक वर्मा देखील वैतागलेला दिसला. सामना बरोबरीत सुटल्याननंतर तिलक वर्माला सुपर ओव्हर हवी होती. त्यानंतर सुपर ओव्हरचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर वाद झाला. अर्शद खानने शेवटचा चेंडू टाकल्यानंतर खेळाडू डगआऊटमध्ये गेले होते. पण पंचांना नो बॉल दिला आणि पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी उतरावं लागलं. त्यामुळे तिलक वर्मा पंचांवर वैतागला. त्यामुळे तिलक वर्मावरीही कारवाई होऊ शकते.