Maharashtra LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit more) आणि केईएमची प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवारच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता, स्टटँड-अप कॉमेडी शोदरम्यान करण्यात आल्याचा आरोप असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस (cyber police) ठाण्याने कॉमेडियन प्रणीत मोरे, मुंबईतील सेजल पवार आणि गुरुग्राम येथील प्रेक्षक हिमांशू जांगडा यांना 16 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार प्रणीत मोरे आणि सेजल पवार हे मंगळवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहणार नाहीत. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दोघांनीही तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून 17 जून रोजी आपले जबाब नोंदवून देण्यास सहमती दिली आहे. त्यामुळे त्यांचे जबाब आता बुधवारी नोंदवले जाणार आहेत.
TV Actress Sanchita Ugale End Life: टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून (Television Industry) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री (TV Actress) संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं आपलं आयुष्य संपवलं आहे. अवघ्या 30व्या वर्षी संचितानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे अख्खं मनोरंजनविश्व हादरलं आहे.
अभिनेत्री संचिता उगले मुंबईतील नालासोपाला परिसरात अचोले पोलीस स्थानकाच्या परिसरात राहते. संचितानं रविवारी, संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास संचितानं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. तर, अभिनेत्री संचिता उगाले हिच्या अशा जाण्यानं अवघी इंडस्ट्री हादरली आहे.