युद्ध बंद तेजी सुरू! शेअर बाजारातील या १२ लार्ज-कॅप शेअर्सवर ठेवा नजर, मिळेल ३४% पर्यंत दमदार परताव्याचा अंदाज
ET Marathi June 16, 2026 09:45 AM
जागतिक स्तरावर झालेल्या शांतता करारामुळे आंतरराष्ट्रीय शेअर बाजाराने सुटकेचा श्वास घेतला आहे. अखेर कच्च्या तेलाच्या किमती खाली येत असून, अनेक देशांना ग्रासणारं ऊर्जा संकट लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. भारतासाठी ही सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण भारत केवळ महागड्या तेलामुळेच नाही, तर देशांतर्गत एलएनजी (LNG) पुरवठ्यामध्ये झालेल्या बिघाडामुळे प्रचंड अडचणीत आला होता.

गॅस हा खत उद्योगासह अनेक मोठ्या क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा कच्चा माल आहे. खत उद्योगाचा विचार केला, तर गॅस महागल्यामुळे एकतर खतांच्या किमती वाढवाव्या लागणार होत्या किंवा सरकारला सबसिडीचा भार सोसावा लागणार होता. या दोन्ही गोष्टी महागाई वाढवणाऱ्या होत्या. पण आता परिस्थिती सुधारत असून खत आणि इतर उद्योगांची डोकेदुखी कमी होणार आहे.

तेजीच्या वातावरणात 'या' नवीन धोक्यापासून सावधानतेलाच्या किमती घसरत असल्या तरी बाजारात अजून एक नवीन अडथळा कायम आहे, तो म्हणजे अपुरा मान्सून. एल निनोच्या (El Niño) प्रभावामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून, याचे थेट पडसाद आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत (Q2 FY27) पाहायला मिळतील. त्यामुळे सध्याच्या तेजीच्या वातावरणात वाहून न जाता गुंतवणूकदारांनी सावध आणि निवडक राहणे गरजेचे आहे. तसेच, जागतिक तूर्तास निवळला असला, तरी भविष्यात टॅरिफ (अमली शुल्क) आणि इतर व्यापारी मुद्द्यांमुळे बाजार पुन्हा अस्थिर होऊ शकतो, हे विसरून चालणार नाही.

गुंतवणुकीचा सोपा नियम लक्षात ठेवाबाजारात चढ-उतार हे येतच राहतात. अशा वेळी मोठे नुकसान टाळण्यासाठी लार्ज-कॅप (मोठ्या भांडवलाच्या) शेअर्समध्ये राहणे कधीही सुरक्षित ठरते. 'इकोनॉमिक टाइम्स स्क्रिनर' आणि 'रिफिनिटिव्हच्या स्टॉक रिपोर्ट प्लस'ने अशाच १२ दर्जेदार लार्ज-कॅप कंपन्यांची यादी तयार केली आहे, ज्यांचे ब्रँड मजबूत आहेत आणि आगामी १२ महिन्यांत त्यांच्यात २७% ते ३४% पर्यंत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तज्ज्ञांनी या शेअर्सला "बाय" (Buy) किंवा "स्ट्रॉन्ग बाय" (Strong Buy) रेटिंग दिले आहे.

पुढील १ वर्षात दमदार परतावा देणारे आघाडीचे लार्ज-कॅप शेअर्स स्त्रोत : स्टॉक रिपोर्ट प्लस

कंपन्यांबद्दल सविस्तर माहिती टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड : ही कंपनी आंतरराष्ट्रीय टेलिकॉम सेवा पुरवते. व्हॉईस सोल्यूशन्स, डेटा आणि मॅनेज्ड सर्व्हिसेस, आणि रिअल इस्टेट अशा तीन क्षेत्रांत कंपनीचा दबदबा आहे. कॉर्पोरेट डेटा ट्रान्समिशन, व्हीपीएन (VPN) आणि रोमिंग सेवांमध्ये ही आघाडीवर आहे.

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड : टाटा समूहाची ही कंपनी चहा, कॉफी, पाणी आणि खाद्यपदार्थांच्या व्यवसायात आहे. टाटा टी, हिमालयन वॉटर यांसारखे मोठे ब्रँड्स भारतासह अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये प्रसिद्ध आहेत.

जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड : वीज निर्मिती आणि विक्री क्षेत्रातील ही एक मोठी एकात्मिक कंपनी आहे. हिमालयातील बासपा आणि कर्शम वांगतू येथील हायड्रो पॉवर प्लांट्ससह विजयनगर आणि रत्नागिरी येथे यांचे थर्मल आणि सोलर प्लांट्स आहेत.

नारायण हृदयालय लिमिटेड : देशभरात २० हून अधिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि हृदय केंद्रे चालवणारी ही आघाडीची हेल्थकेयर कंपनी आहे. कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स आणि ट्रान्सप्लांट सेवांमध्ये यांचा मोठा नावलौकिक आहे.

गुजरात फ्लुरोकेमिकल्स लिमिटेड : ही केमिकल्स क्षेत्रातील मोठी कंपनी असून फ्लुरोपॉलिमर, रेफ्रिजंट गॅसेस आणि 'इनोफ्लॉन' (INOFLON) ब्रँड अंतर्गत पीटीएफई (PTFE) रेझिन्स बनवते. फार्मा आणि ॲग्रोकेमिकल क्षेत्राला ही रसायने पुरवली जातात.

मॅनकाइंड फार्मा लिमिटेड : मॅनफोर्स, न्यूरोकाइंड आणि टेल्मीकाइंड यांसारखे लोकप्रिय ब्रँड्स असणारी ही देशातील दिग्गज फार्मा कंपनी आहे. हृदयविकार, गॅस्ट्रो आणि अँटी-इन्फेक्टिव्ह औषधांच्या निर्मितीत हिचा मोठा वाटा आहे.

बँक ऑफ बडोदा लिमिटेड : देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून हिच्या ८,००० हून अधिक शाखा आहेत. डिजिटल बँकिंग, व्हॉट्सॲप बँकिंग आणि रिटेल ते कॉर्पोरेट कर्जांपर्यंत या बँकेचे मोठे जाळे आहे.

जीई व्हर्नोव्हा टी अँड डी इंडिया लिमिटेड : पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन (वीज वहन) क्षेत्रातील ही तज्ज्ञ कंपनी आहे. अल्ट्रा-हाय व्होल्टेज स्विचगिअर, ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशन ऑटोमेशनसाठी लागणारे डिजिटल सॉफ्टवेअर ही कंपनी बनवते.

ग्लोबल हेल्थ लिमिटेड : उत्तर आणि पूर्व भारतात 'मेदान्ता' या ब्रँड अंतर्गत प्रगत आरोग्य सेवा पुरवणारी ही मोठी हॉस्पिटल चेन आहे. कार्डियाक सर्जरी, कॅन्सर उपचार आणि यकृत प्रत्यारोपणात ही आघाडीवर आहे.

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स : श्वसनविकार, त्वचाविकार आणि कर्करोग (ऑन्कोलॉजी) वरील ही जागतिक कंपनी कार्यरत आहे. फॅबीफ्लू आणि रायल्ट्रिस सारखी प्रसिद्ध उत्पादने या कंपनीची आहेत.

जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड : लोखंड आणि पोलाद उत्पादनातील भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. जेएसडब्ल्यू निओस्टील ( TMT Bars) आणि कलरॉन+ या ब्रँड्ससह महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये यांचे मोठे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत.

बजाज ऑटो लिमिटेड : पल्सर, एवेंजर, चेतक (इलेक्ट्रिक) आणि प्लॅटिना यांसारख्या दुचाकी तसेच थ्री-व्हीलर वाहनांची निर्मिती करणारी ही जागतिक ऑटोमोबाईल कंपनी आहे. भारतासोबतच आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतही हिचा मोठा व्यवसाय आहे.

-
(Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. )
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.