ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
महेश गलांडे June 16, 2026 09:13 PM

1. मान्सून कोकणातच अडकला, 20 जूननंतर मुंबईत सरकरणार; उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट, बीएमसीकडून 20 टक्के कपातीचा प्रस्ताव https://tinyurl.com/5yknh2jp 

2. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहा मोठे निर्णय https://tinyurl.com/2r66syjv  पुण्यातील तीर्थक्षेत्र भीमाशंकर देवस्थानाकडून मोठा निर्णय; व्हीआयपी अन् सामान्य भाविकांसाठी एकच नियम, ऑनलाईन बुकिंगशिवाय दर्शन नाही https://tinyurl.com/5xak2c99 

3. ऑपरेशन टायगरबाबत संजय राऊतांचा दावा; म्हणाले, खासदारांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिलाय, आई, साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेऊन सांगितलं तुम्हाला सोडणार नाही https://tinyurl.com/44wv6p2v धाराशिवमधील पवनराजे निंबाळकर खटल्यात 20 जूनला निकाला, तारीख पुन्हा पुढे ढकलली; खासदार ओमराजे म्हणाले,  काही कमतरता दूर करण्यासाठी नवी तारीख, न्यायाची अपेक्षा https://tinyurl.com/54ev9247 

4. विधान परिषद निवडणुकीत साताऱ्यातील वादावर पडदा, शिवसेनेचे प्रत्येक मत महायुतीच्या उमेदवारालाच द्या; एकनाथ शिंदेंचा शंभूराज देसाईंना आदेश https://tinyurl.com/m9smf3yc राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये रात्री खलबतं, लवकरच रुपाली चाकणकरांचा वारस निवडला जाणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडेंच्या नियुक्तीची शक्यता https://tinyurl.com/3kzyx266 

5. नाशिक विधानपरिषदेत युतीच्या विरोधात मतदानाचा अजेंडा राबवणार;ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीच्या नव्या खेळीची चर्चा https://tinyurl.com/y449fdrf  नागपुरात मविआला धक्का, शरद पवार गटाचे नगरसेवक 'नॉट रिचेबल'; हिंगणा नगरपंचायतमधील 6 नगरसेवक लपवण्यात आल्याची चर्चा https://tinyurl.com/29c89v6x 

6. संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन भाजप आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
https://tinyurl.com/yuya8p4r सांगलीत वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते' https://tinyurl.com/bdsj496f 

7. मुंबईत तुकाराम मुंढेंच्या एफडीएची धाड; स्तन, नितंबांचा आकार वाढवण्याचा फसवे दावे करणारी उत्पादनं जप्त, कराडमध्येही 29 लाखांची सौंर्दयप्रसाधनं जप्त https://tinyurl.com/bdhhjdbf  पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका; सीएनजीच्या दरात किलोमागे एक रुपयांची, तर पीएनजीच्या (PNG)दरात 85 पैशांची वाढ, MNGL कडून मध्यरात्री पासून दरवाढ https://tinyurl.com/y98asem7 

8. आता कौटुंबिक वाटणीची मोजणी फक्त 200 रुपयांत, 90 दिवसांत प्रक्रिया पूर्ण होणार; सरकारकडून जमीन मोजणीचे नवे नियम जारी
https://tinyurl.com/yhy5yj27 

9. प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; वायूसेना अधिकाऱ्याच्या पत्नीला भेटायला बोलावून अत्याचार; नागपूर हादरलं https://tinyurl.com/madpnczv मुंबईतील दहिसरमध्ये भाजप मंडल महामंत्र्याचं बारमधील मुलीशी नको ते कृत्य; रिव्हॉल्व्हर दाखवून शरीराचे लचके तोडले, पोलीस आयुक्तांकडून आरोपी प्रतापसिंह देवडा कारवाईचे आदेश https://tinyurl.com/zav3bjzh 

10 अशोक खरातच्या पत्नीला मोठा दणका, कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; हायकोर्टाचा कडक ताशेरे, आता पोलीस कोठडीत रवानगी होणार https://tinyurl.com/bdhp8hmw नाशिकच्या गोदावरी काठावर संशयास्पद काळी सुटकेस, बॅगमध्ये अज्ञात महिलेचा मृतेदह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून तपास सुरू https://tinyurl.com/yh6erhn6 

*एबीपी माझा स्पेशल*

'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरमध्ये परतणार, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंद्राच्या पाहणीसाठी दाखल
https://tinyurl.com/5xzay6cz 

शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
https://tinyurl.com/4s5p6ebs 

बाप-लेकीची ती ठरली पहिली अन् शेवटचीच भेट; नाशिकमध्ये गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा दुर्दैवी अंत, अख्खं गाव हळहळलं!
https://tinyurl.com/bdu9c9a3 

*एबीपी माझा Whatsapp Channel* 
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.