Arbaaz Khan: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाझ खान( Arbaaz Khan) सध्या चर्चेत आहे, त्याच्यासोबत कोलकाता मध्ये घडलेल्या एका विचित्र घटनेमुळे. एका कार्यक्रमासाठी अरबाझ कोलकाताला गेलेला, त्यावेळी तिथून निघताना एक व्यक्ती सुरक्षारक्षकांना चकवून अचानक त्याच्या कारमध्ये घुसला आणि आतच जाऊन बसला. यावेळी अरबाझही काहीसं घाबरला होता.यानंतर मात्र, सतर्क सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला तातडीने गाडीतून बाहेर काढले.अरबाजच्या सिक्योरिटी गार्डने त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. या घटनेचा VIDEO सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही घटना घडली त्यावेळी अरबाझ आपल्या कारजवळचं उभा असल्याचं दिसलं. मनोरंजनसृष्टीत आजकाल अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असताना कलाकारांना अशा विचित्र प्रकारांना समोरे जावं लागत असल्याचं चाहते म्हणत आहेत.
बॉलिवूड अभिनेता अरबाज खानसोबत कोलकाता येथे एक धक्कादायक प्रकार घडला. एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर अरबाज आपल्या कारमध्ये बसण्यासाठी निघाला होता. मात्र, अचानक एक अनोळखी तरुण सुरक्षा रक्षकांना चकवा देत थेट त्याच्या गाडीपर्यंत पोहोचला. एवढेच नाही तर त्याने कारचा दरवाजा उघडून गाडीत प्रवेशही केला. या घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अरबाज खान आपल्या कारजवळ उभा असल्याचे दिसते. तो गाडीत बसण्याच्या तयारीत असतानाच गर्दीतून वाट काढत आलेल्या एका तरुणाने थेट कारमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार इतक्या वेगाने घडला की काही क्षणांसाठी उपस्थितांनाही काय घडत आहे हे समजले नाही. अचानक कारमध्ये घुसलेल्या त्या व्यक्तीमुळे अरबाजही काहीसा घाबरलेला आणि अस्वस्थ दिसत होता.
Makhanchand "Makkhi" Prajapati Pandey Akka #Arbaazkhan Craze At #Kolkata 🥰🔥👇🏼#Salmankhan #Maatrubhumi pic.twitter.com/iek1aArNC2
— R gulati (@ritesh272727) June 15, 2026
घटनेची माहिती मिळताच अरबाजच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत त्या तरुणाला गाडीतून बाहेर ओढले. त्यानंतर त्या व्यक्तीने सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून बाउन्सर्सनी त्याला गाडीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गर्दीतून "त्याला मारा, त्याला मारा" अशा आरोळ्याही ऐकू आल्या.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला जमावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पुन्हा गाडीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बाउन्सर्सशी हुज्जत घालू लागला. त्याच्या गैरवर्तनामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला चांगलाच चोप दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या सर्व गोंधळात अरबाज काही काळ तिथेच उभा राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत होता. नंतर त्याने सुरक्षा रक्षकांना त्या तरुणाला सोडून देण्यास सांगितल्याचेही सांगितले जात आहे. अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अरबाज खान सुरक्षितपणे आपल्या गाडीत बसला आणि तातडीने तेथून निघून गेला. खान कुटुंबाला याआधी अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळालेल्या असल्याने या घटनेकडे सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी म्हणून पाहिले जात आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या प्रकाराला "धक्कादायक" आणि "भयानक" असे म्हटलं आहे.