बुधवारी इंडिया ए टीमचा पहिला सामना असणार आहे. भारतासमोर ट्राय सीरिजमधील या सामन्यात अफगाणिस्तानचं आव्हान असणार आहे. या सामन्याला सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. (Photo Credit : PTI)
त्यानंतर दुपारी दीड वाजता सिनिअर टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील या दुसऱ्या सामन्याला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. (Photo Credit : PTI)
तर 17 जूनपासून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. (Photo Credit : GETTY IMAGES)
क्रिकेट चाहत्यांना बुधवारी 17 जून रोजी तब्बल 7 सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. या 7 पैकी टीम इंडियाचे 3 सामने असणार आहे. वुमन्स, मेन्स आणि इंडिया ए भारताचे असे 3 संघ एक्शन मोडमध्ये असणार आहेत. तसेच इतर सामन्यांबाबतही जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)
वुमन्स टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत दुपारी 3 वाजता ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश अशी लढत होणार आहे. तर रात्री 11 वाजता पाकिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. तर रात्री दीड वाजता बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी 20I सामना होणार आहे. (Photo Credit : PTI)