Deool Band 2: 'देऊळ बंद 2' (Deool Band 2 Movie) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) छप्परफाड कमाई करत आहे. या सिनेमात ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी (Mohan Joshi) व्यतिरिक्त प्रवीण तरडे (Pravin Tarde) आणि महेश मांजरेकर (Mahesh Manjhrekar) यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, 'देऊळ बंद 2' हा सिनेमा 2026 या वर्षातील सर्वात जास्त प्रॉफिट करणारा चित्रपट ठरला आहे. हा सिनेमा रिलीज होऊन 26 दिवस उलटले आहेत. 27 व्या दिवशी या सिनेमानं नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, 'देऊळ बंद 2' हा सिनेमा अवघ्या 10 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. या सिनेमानं आतापर्यंत भारतात 68.72 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. तसेच 81.08 कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे. या सिनेमानं आतापर्यंत अनेक सिनेमांना पछाडलं आहे. या चित्रपटानं 'क्रांतीज्योती विद्यालय' सिनेमाच्या कमाईला पछाडलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'क्रांतीज्योती विद्यालय' हा सिनेमा अवघ्या 4 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता.
'क्रांतीज्योती विद्यालय'नं 27.35 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. दरम्यान, 'देऊळ बंद 2' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर उत्तम घौडदौड सुरू आहे. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंडनुसार, या सिनेमानं 26 व्या दिवशी 50 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, 27 व्या दिवशी म्हणजेच चौथ्या मंगळवारी या सिनेमानं 55 लाखांचं कलेक्शन केले आहे. मंगळवारी या सिनेमाचे 860 शोज पार पडले होते. 860 शोजमधून या सिनेमानं 55 लाखांचं कलेक्शन केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमानं आतापर्यंत एकूण 69.27 कोटींचे कलेक्शन केले आहे. हा सिनेमा लवकरच 80 कोटींचाही टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'देऊळ बंद 2' हा सिनेमा प्रवीण तरडे यांनी तयार केला आहे. हा सिनेमा 21 मे 2026 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. 2015 साली प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. पहिल्या पार्टलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. दुसऱ्या पार्टलाही प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: