जळगाव : मृग नक्षत्र सुरू होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला आहे. अर्थात जून महिना अर्ध्यावर आला तरी जळगाव जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन अद्याप झाले नसल्याने उष्णतेचा तडाखा कायम (Jalgaon monsoon delay latest news) आहे. तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास स्थिरावला असून, पावसाची प्रतीक्षा आणखी लांबल्याने नागरिकांसह शेतकरीही चिंतेत आहेत.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामासाठी शेत मशागतीची कामे पूर्ण झाली असली तरी समाधानकारक पाऊस नसल्याने अद्याप पेरणी सुरू होऊ शकलेली नाही. पाऊस आणखी लांबल्यास पेरणीचे नियोजन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. यातच तापमानाचा पारा ४० अंशावर कायम असल्याने सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून आहेत.
Monsoon Delay Maharashtra : आधी 11, मग 15 अन् आता थेट...; महाराष्ट्रात 'या' तारखेला मान्सून सक्रिय होणार! हवामान खात्याचा नवा अंदाज, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस? दिवसभर उन्हाचा चटकादरम्यान, काल (ता.१६) सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. तर दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक वाढली होती. अधूनमधून आकाशात ढगांची वर्दळ दिसत असली तरी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत नसल्याने जिल्हाभर उकाड्याचे वातावरण कायम आहे. उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे उकाड्याचा त्रास देखील वाढला आहे.
Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली पाऊस लांबलेलाचहवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस वातावरणात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता असली तरी जिल्ह्यात चांगला पाऊस होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा आहे. त्यामुळे जूनच्या मध्यंतरातही जळगावकरांना ४० अंशांच्या उष्णतेचा सामना करावा लागत असून, पावसाची प्रतीक्षा कायम आहे.