Kolhapur Water Update : नऊ नद्यांवरील उपसाबंदी शिथिल; 'इरिगेशन फेडरेशन'च्या मागणीनंतर 'जलसंपदा'चा निर्णय, पाहा तुमच्या भागातील नदीचा समावेश आहे का?
esakal June 17, 2026 12:45 PM

कोल्हापूर : उन्हाच्या तडाख्याने शेती पिके वाळत आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, तेथे नद्यांवरील उपसाबंदी उठवावी, अशी आक्रमक मागणी राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने (irrigation ban relaxation) केली. त्यानंतर जलसंपदा विभागाकडून दूधगंगा वगळता नऊ नद्यांवरील उपसाबंदी तीन दिवस शिथिल करण्याचा निर्णय घेतला.

माजी आमदार संजय घाटगे व फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे व कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

जलसंपदा विभागाने दूधगंगा नदी वगळता इतर सर्व नद्यांवरील उपसाबंदी आज, बुधवार ते शुक्रवारपर्यंत (ता.१९) शिथिल करण्यात येईल, असे जाहीर केले. २० जूनला धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील आदेश देण्यात येतील. जि. प. सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, बयाजी शेळके, प्रदीपकुमार पाटील आदी उपस्थित होते.

Monsoon Delay Maharashtra : आधी 11, मग 15 अन् आता थेट...; महाराष्ट्रात 'या' तारखेला मान्सून सक्रिय होणार! हवामान खात्याचा नवा अंदाज, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस? व्हायरल पत्रामुळे संभ्रम

उपसा बंदीचे आदेश रद्द झाल्याचे पत्र रात्री सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. राज्य इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर म्हणाले, ‘उपसाबंदी शिथिल करण्याबाबत आम्ही सायंकाळी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिल्यानंतर भेट देऊन चर्चा केल्यानंतर जलसंपदा विभागाकडून तीन दिवसांसाठी उपसाबंदी शिथिल केल्याच्या आदेशाचे पत्र दिले होते. परंतु, हा निर्णय रद्द झाल्याचे पत्र रात्री उशिरापर्यंत मिळालेले नाही.’

Mahabaleshwar Water Shortage : महाबळेश्वर-पाचगणीवर मोठं संकट! 'वेण्णा लेक'ने गाठला तळ; केवळ 50 ते 52 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक, पाऊस लांबल्यास काय होणार? 'पिण्याचे पाणी शिल्लक राहिल्यास शेतीसाठी विचार'

कोल्हापूर जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत फक्त पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य राहणार आहे. त्यानुसार नियोजन केले आहे. त्या व्यतिरिक्त पाणी शिल्लक राहिल्यास त्याचा आढावा घेऊन ते शेतीसाठी देण्याचा विचार केला जाईल, असे जलसंपद विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच नागरिकांनी घाबरू नये, पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘अल-निनो’च्या पार्श्‍वभूमीवर सरकारने नद्यांवर उपसाबंदी लागू केली आहे. यासंदर्भात अधीक्षक अभियंता पाटोळे यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात चार मोठी धरणे असून, त्यातील राधानगरीत २६ टक्के, तुळशीमध्ये ४३ टक्के, वारणेमध्ये ३३ टक्के, दूधगंगेत नऊ टक्के इतका पाणीसाठा सध्या आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३५ ते ४० टक्के पाणीसाठा कमी आहे. गेल्यावर्षी १८ मे पासून पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे यावर्षीच्या तुलनेत गेल्यावर्षी पाणीसाठा जास्त होता. त्याचबरोबर जिल्ह्यात १३ मध्यम प्रकल्पांमध्ये सुमारे २३ ते ४० टक्के इतका पाणीसाठा आहे. यातील आंबेओहोळमध्ये ६० टक्के व सर्फनालामध्ये ५२ टक्के पाणीसाठा आहे. या धरणांमध्ये उपसाबंदी लागू केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.