Global Inflation: युद्ध संपले तरी महागाईची धग कायमच! इंधन, प्रवास, मालवाहतूक दर लगेच कमी होणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज
esakal June 17, 2026 12:45 PM

न्यूयॉर्क : अमेरिका-इराण युद्धसमाप्तीसाठी झालेल्या प्राथमिक करारामुळे जागतिक बाजारपेठेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही इंधन, विमानप्रवास, किराणा माल, खते अन् मालवाहतुकीचे दर तातडीने कमी होण्याची शक्यता नसल्याचे अर्थतज्ज्ञ आणि उद्योग विश्लेषकांचे मत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील कोंडीमुळे तेल, खते, अन्नधान्य आणि विविध वस्तूंच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला असून, त्याचे परिणाम पुढील काही महिने जाणवत राहतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Deool Band 2: ‘देऊळ बंद-२’ ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी; प्रवीण तरडे-कैलास वाणी, साईबाबांच्या शिर्डीत संकल्प जाहीर

‘कोलंबिया बिझनेस स्कूल’चे अर्थतज्ज्ञ ब्रेट हाऊस म्हणाले, ‘‘या संघर्षामुळे केवळ अमेरिका-इराणसह अवघ्या जगाचे नुकसान झाले आहे.’’ अर्थतज्ज्ञ, उद्योगविश्वातील विश्लेषकांच्या मते, पश्चिम आशियातून तेलपुरवठा पुन्हा सुरळीत झाला तरी स्थानिक पेट्रोल पंप, सुपरमार्केट आणि अन्य किरकोळ बाजारपेठांत ग्राहकांना त्याचा लाभ मिळण्यासाठी काही काळ जावा लागेल.

मानप्रवास स्वस्त होणार नाही

विमान तिकिटांच्या किमती तातडीने कमी होण्याची शक्यता कमी आहे. विमान कंपन्या इंधनाचा साठा आगाऊ करतात अन् तिकिटांचे दर मुख्यतः मागणीवर अवलंबून असतात. त्यामुळे इंधनाचे दर कमी झाले, तरी त्याचा अनुकूल परिणाम विमानप्रवास खर्चावर दिसण्यासाठी काही महिने लागू शकतात. काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांकडून आकारला जाणारा इंधन अधिभार कमी होणे हा दिलाशाचा पहिला टप्पा ठरू शकतो. ब्रेट हाऊस म्हणाले, की विमानप्रवासाच्या खर्चात लगेच कोणतीही लक्षणीय घट होईल असे वाटत नाही. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या बिझनेस स्कूलचे प्राध्यापक गॉर्डन हो यांच्या मते काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी लागू केलेल्या ‘इंधन अधिभारा’त सर्वप्रथम कपात होण्याची शक्यता आहे.

खतटंचाईमुळे शेती अडचणीत

युद्धापूर्वी जगातील सुमारे ३० टक्के खतांची वाहतूक होर्मुझ सामुद्रधुनीतून होत होती. संघर्षामुळे पुरवठा विस्कळित झाल्याने खतांच्या किमती वाढल्या आहेत. अनेक देशांतील शेतकरी आवश्यक खतांशिवाय पेरणी करत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने या परिस्थितीचा पिकांच्या उत्पादनावर आणि अन्नधान्याच्या उपलब्धतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याचा इशारा दिला आहे. एकूणच, अमेरिका-इराण युद्धसमाप्तीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला असला, तरी त्याचे प्रतिकूल आर्थिक परिणाम अल्पावधीत संपणार नसून, ग्राहक, शेतकरी आणि उद्योग क्षेत्राला काही काळ वाढीव खर्चाचा सामना करावा लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

इंधनदर घटण्यास विलंब

प्राथमिक कराराच्या घोषणेनंतर अमेरिकेतील कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १२० डॉलरवरून सुमारे ८० डॉलरपर्यंत खाली आला आहे. मात्र, तेल शुद्धीकरण प्रकल्प आगाऊ खरेदी केलेल्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करत असल्याने पेट्रोलचे दर कमी होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. ‘एनर्जी पॉलिसी रिसर्च फाउंडेशन’चे मायकल लिंच म्हणाले, की कच्चे तेल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी अनेक प्रक्रियांतून जाते. त्यामुळे पेट्रोलच्या किमती हळूहळू कमी होतात. टेक्सास ए अँड एम विद्यापीठातील रासायनिक अभियांत्रिकी आणि रसायनशास्त्राचे प्राध्यापक मार्क बार्टो यांच्या मते, ज्या भागांत स्थानिक गरजा भागविण्यासाठी पुरेशी शुद्धीकरण क्षमता उपलब्ध नाही, तेथे इंधन दर कमी होण्यास आणखी विलंब होऊ शकतो.

Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा.. किराणा लगेच स्वस्त नाही

अन्नधान्याच्या किमतींवरही महागाईचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. अन्न उत्पादन आणि वितरण व्यवस्थेत इंधनाचा मोठा वाटा असल्याने ऊर्जा पुरवठ्यातील व्यत्ययाचा परिणाम किराणा मालाच्या दरांवर होत आहे. एकदा वाढलेले दर पुन्हा कमी होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे पुढील काही महिन्यांत ग्राहकांना अन्नधान्य महागाईचा सामना करावा लागू शकतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.