महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रगती ठप्प
काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
हवामान विभागाचा यलो अलर्ट
मॉन्सूनच्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली
मान्सून दखल होण्यासाठी जुलै उजडणार
Maharashtra Today Weather Update News राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष सध्या मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले असून, पावसाअभावी अनेक भागांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्याचा तिसरा आठवडा संपायला आला तरी महाराष्ट्रातील बहुतांश भागात मॉन्सूनची प्रगती ठप्प झाली आहे. imd च्या ताज्या अंदाजानुसार, मान्सून येण्यासाठी जुलै महिना उजाडण्याची शक्यता वर्तवली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक उष्णता व दमट हवामानाचा सामना करत आहेत. हवामान विभागाने आज राज्यात उष्ण व दमट वातावरण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या पावसादरम्यान आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडू शकतात. मात्र, उष्णतेची तीव्रता आणि हवेत असलेला दमटपणा कायम राहणार असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विश्वासू नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार प्रवेशदरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक हवामान प्रणालींचा अभाव असल्याने मॉन्सूनची वाटचाल मंदावली आहे. अरबी समुद्रात मॉन्सून अडखळल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांहून अधिक काळ पुढे सरकलेले नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. सोमवारी मॉन्सूनने संपूर्ण आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या काही भागांमध्ये प्रगती केली होती. मात्र, त्यानंतर त्याची गती मंदावल्याचे दिसून आले.
Skin Care : घामामुळे तुमच्याही अंगाला सतत खाज येते? 'हे' ५ घरगुती उपाय नक्की कराहवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या आगमनात होत असलेल्या विलंबामुळे खरीप हंगामाच्या तयारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आता जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असून, हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.