Argentina vs Algeria FIFA World Cup 2026 match Marathi report : २० वर्षांचा अनुभव घेऊन मैदानावर उतरलेल्या लिओनेल मेस्सीने ( Lionel Messi) त्याचा करिष्मा दाखवून दिला. ३८ वर्षीय मेस्सीचा हा कदाचित शेवटचा वर्ल्ड कप असल्याने, तो मैदानावर येताच वातावरण एकदम भावनिक झालेला दिसले. अर्जेंटिनाचे चाहते आपल्या भावनांना अश्रू्ंद्वारे वाट मोकळी करून देताना दिसले. मेस्सीनेही चाहत्यांचा विश्वास कायम राखताना तीन भन्नाट गोल करून फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहातील अनेक विक्रम आपल्या नावावर केले. अर्जेंटिनासाठी गोल करणारा युवा व वयस्कर, खेळाडूचा मान त्याने पटकावला आणि महान फुटबॉलपटू पेले यांचाही विक्रम त्याने मोडला. मेस्सीच्या या करिष्माई हॅटट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाने ३-० अशा फरकाने अल्जेरियाला नमवले.
कॅन्सस सिटीमधील ॲरोहेड स्टेडियम, आज मेस्सीमय झाले होते. १६ जून २००६ मध्ये वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणारा युवा मेस्सी, आज अर्जेंटिनाचा वयस्कर खेळाडू म्हणून खेळतोय. पण, त्याचा वेग, गोल करण्याची भूक आजही तशीच आहे. त्यामुळेच सामन्याच्या पाचव्या मिनिटाला त्याने अप्रतिम गोल केला, परंतु दुर्दैवाने तो ऑफ साईड ठरला.
अल्जेरियाकडूनही त्याला त्वरित उत्तर मिळालेले, परंतु त्यांच्याही नशीबी अम्पायरचा ऑफ साईड फ्लॅग होता. दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ स्पर्धा सुरू असताना मेस्सीने त्याचा करिष्मा दाखवला.. १७ व्या मिनिटाला बॉक्सच्या बाहेरून भन्नाट गोल करून अर्जेंटिनाला त्याने १-० अशी आघाडी मिळवून दिली आणि अनेक विक्रम नावावर केले.
Argentina vs Algeria : १९६६ नंतर कोणालाच नाही जमले, ते लिओनेल मेस्सीने केले... १ गोल अन् ५ भन्नाट विक्रम, पेले यांचाही पराक्रम मोडलाडी पॉलच्या फ्री किकवर चेंडू ताब्यात घेऊन त्याने मैदानाच्या मध्यभागातून पुढे कूच केली आणि लांबूनच जोरदार फटका मारला. गोलरक्षक लुका झिदानच्या बोटांना स्पर्श करून चेंडू थेट गोलजाळीत विसावला अन् संपूर्ण स्टेडियम जल्लोषाने दुमदुमले. मेस्सीच्या कारकिर्दीतील १४ व्या वर्ल्ड कप गोलमुळे अर्जेंटिनाने आघाडी घेतली असून सामन्यावर त्यांचेच नियंत्रण राहिले. अल्जेरियानेही बरोबरीसाठी जोर लावला होता, परंतु अर्जेटिनाची बचावभींत मजबूत होती. दुसऱ्या हाफमध्येही अर्जेटिनाकडून जोरदार आक्रमण झालेले दिसले. ६० व्या मिनिटाला मेस्सीने सहज गोल करून अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी मजबूत केली.
वर्ल्ड कप स्पर्धेतील हा त्याचा १५ वा गोल ठरला आणि तो स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या ब्राझिलच्या रोनाल्डोच्या बाजूला जाऊन दुसऱ्या स्थानावर बसला. जर्मनीचा मिरोस्लाव्ह क्लोस ( १६) अव्वल स्थानावर आहे. अॅलेक्सिस मॅक अॅलिस्टरचा दूरवरून मारलेला जोरदार फटका झिदानला अडवता आला नाही आणि तिथेच असलेल्या मेस्सीने रिबाउंडवर ताबा मिळवून शांतपणे गोल केला. ६६व्या मिनिटाला मेस्सीचा हॅटट्रिक गोल अल्जेरियाच्या गोलरक्षकाने रोखली.
Argentina vs Algeria : लिओनेल मेस्सीने इतिहास रचला! Fifa World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच; किलियन एमबापेला काही तासांत धक्काफ्रान्सच्या किलियन एमबाप्पे, नॉर्वेच्या एर्लिंग हालंड आणि आता अर्जेंटिनाच्या मेस्सीने या वर्ल्ड कपचा आजचा दिवस प्रत्येकी दोन गोल करून अविस्मरणीय केला. मेस्सीने एक पाऊल पुढे टाकताना ७६ व्या मिनिटाला हॅटट्रिक पूर्ण केली आणि ही त्याची वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक ठरली. यासह त्याने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक १६ गोलच्या विक्रमाशी बरोबरी केली. वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक नोंदवणारा तो वयस्कर खेळाडू ठरला. अर्जेंटिनाे ३-० असा विजय पक्का केला.