Pandharpur Vitthal: अधिक मासात विठुरायाच्या चरणी ९.४६ कोटींचे दान; १४ लाख भाविकांनी घेतलं दर्शन; हुंडी, देणग्या आणि सोने-चांदीचा वर्षाव
esakal June 17, 2026 12:45 PM

पंढरपूर : अधिक मासाच्या निमित्ताने श्री विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या राज्यभरातील भाविकांनी विठुरायाच्या चरणी तब्बल नऊ कोटी ४६ लाख रुपयांचे दान अर्पण केले. गेल्या वेळच्या तुलनेत यंदाच्या अधिक महिन्यात दोन कोटी २६ लाख रुपयांची वाढ झाली आहे. महिनाभरात सुमारे १४ लाख ६० भाविकांनी पंढरीत येऊन सावळ्या विठुरायाचे मनोभावे दर्शनही घेतले, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Deool Band 2: ‘देऊळ बंद-२’ ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी; प्रवीण तरडे-कैलास वाणी, साईबाबांच्या शिर्डीत संकल्प जाहीर

पुरुषोत्तम मासात श्री विठ्ठल दर्शन आणि चंद्रभागा स्नानाला वारकरी संप्रदायामध्ये विशेष महत्त्व असते. याच अधिक महिन्याची पर्वणी साधण्यासाठी देशभरातून सुमारे १४ लाख भाविक पंढरीत आले होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी विठुरायाच्या चरणी भरभरून दानही अर्पण केले. अधिक महिन्यात दानाला महत्त्व असते. त्यामुळे भाविकांनी पंढरीत येऊन गोरगरिबांना दान केलेच, शिवाय श्री विठ्ठल मंदिर समितीच्या पेटीतही सढळहस्ते दान केल्याचे दिसून आले.

१७ एप्रिल ते १५ जूनदरम्यान अधिक मास झाला. या महिन्यामध्ये राज्यभरातून विविध भागांतील भाविक दर्शनासाठी आले होते. महिनाभरामध्ये सुमारे ५ लाख ३० हजार ६२० भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन, तर ९ लाख ३० हजार ६८ भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने देवाच्या चरणावर अर्पण केले.

भाविकांनी असे केले दान

अधिक मास कालावधीत भाविकांकडून ‘श्रीं’च्या चरणी ८१ लाख ७२ हजार ६७९ रुपये अर्पण करण्यात आले. याशिवाय देणगीद्वारे दोन कोटी तीन लाख ५५ हजार १८०, लाडू प्रसाद विक्रीतून ७२ लाख ३३ हजार ७००, भक्तनिवासातून एक कोटी २५ लाख ५६ हजार ७२३, पूजाविधीमधून ११ लाख ३ हजार ४२७, हुंडीपेटीतून दोन कोटी ५३ लाख ८२ हजार ३४४, सोने-चांदी अर्पणातून एक कोटी ७८ लाख ४३ हजार १६७ तसेच फोटो विक्री, महावस्त्रे, शेणखत, गोमूत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी विविध माध्यमांतून १९ लाख ८१ हजार १३, असे एकूण नऊ कोटी ४६ लाख रुपयांचे उत्पन्न मंदिर समितीला मिळाले आहे.

Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा.. तीन वर्षांपूवीच्या तुलनेत दोन कोटींची वाढ

२०२३ च्या अधिक मासात मंदिर समितीस सात कोटी १९ लाख ४२ हजार ४३७ इतके उत्पन्न मिळाले होते. यंदा नऊ कोटी ४६ लाख २८ हजार २३३ इतके उत्पन्न मिळाले. मागील अधिक मासाच्या तुलनेत दोन कोटी २६ लाख ८५ हजार ७९६ इतकी वाढ झाली आहे. या उत्पन्नातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांना अधिक चांगल्या आणि पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर समिती सातत्याने प्रयत्नशील राहील, असे मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.