प्रत्येकाच्या आयुष्यात बऱ्या वाईट घटना घडत असतात. यातील काही घटनांचा ठराविक कालावधीने आपल्याला सहज विसर पडतो. तर काही घटना आपल्या मनात दिर्घकाळ घर करून राहतात. त्यांची आठवण वारंवार येते आणि मनाला त्रास देते. अशा आठवणी मनातून पूर्णपणे “डिलीट” करणे शक्य नसले तरी त्यांचा आपल्या मनावर होणारा परिणाम मात्र कमी करता येतो. त्यासाठी काय करावं ते बघूया.
१. आठवणींपासून पळू नका
वाईट अनुभव विसरण्याचा जितका जास्त प्रयत्न कराल, तितक्या त्या आठवणी पुन्हा मनात येऊ शकतात. त्या अनुभवाला स्वीकारण्याचा प्रयत्न करा.
२. भावना व्यक्त करा
विश्वासू व्यक्तीशी बोला, डायरी लिहा किंवा आपल्या भावना व्यक्त करण्याचा सुरक्षित मार्ग शोधा.
३. वर्तमानात राहण्याचा सराव करा
ध्यान, श्वसनाचे व्यायाम आणि माइंडफुलनेस यामुळे मन वर्तमान क्षणात राहण्यास मदत होते.
४. सकारात्मक अनुभव वाढवा
नवीन छंद, व्यायाम, प्रवास, मित्र-परिवारासोबत वेळ घालवणे यामुळे मेंदू नवीन सकारात्मक आठवणी तयार करतो.
५. स्वतःला दोष देऊ नका
भूतकाळातील घटना बदलता येत नाहीत. त्यातून शिकून पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करा.
६. गरज वाटल्यास तज्ज्ञांची मदत घ्या
जर त्या आठवणींमुळे झोप, अभ्यास, काम किंवा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते.
वाईट आठवणी मिटवता येत नसल्या तरी त्यांच्याशी असलेले भावनिक ओझे कमी करता येते. काळ, योग्य आधार आणि स्वतःची काळजी यामुळे मन हळूहळू बरे होऊ शकते.