छोट्या पडद्यावर काही दिवसातच आपलं वेगळं स्थान निर्माण केलेली हिंदी मालिका 'महादेव अँड सन्स' सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही मालिका नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये. सध्या मालिकेवर जोरदार टीका होतेय. कारण आहे मालिकेतील वादग्रस्त सीन्स. मालिकेत रोमान्सच्या नावाखाली शारीरिक छळ आणि हिंसाचार दाखवण्यात आलाय. त्यामुळे मालिकेला जबरदस्त ट्रोल केलं जातंय. त्या सीन्सवर प्रेक्षक चांगलेच नाराज झालेत. महत्वाचं म्हणजे या मालिकेचा मराठी रिमेक स्टार प्रवाहवर दाखवण्यात येतोय.
ही मालिका आहे कलर्स मराठीवरील 'महादेव अँड सन्स'. मालिकेत नेहा राणा, गर्विता साध्वनी, स्नेहा वाघ, शक्ती आनंद यांच्या मुख्य भूमिका आहेत. मात्र या मालिकेत महादेवचा मुलगा धीरज रज्जीला कानाखाली मारतो. त्यानंतर तो तिला धक्का देतो. बर्फाने भरलेल्या पाण्यात तो तिला ढकलतो. एवढंच नव्हे तर जबरदस्ती तिच्यासोबत रोमान्सही करतो. यामध्ये रज्जीला इस्त्रीचा चटका लागून तिचा हात भाजतो. धीरज रज्जीला म्हणतो की माझ्या मनात तुझ्यासाठी काहीच फिलिंग्स नाहीत. फक्त द्वेष आहे. मात्र हा सगळं प्रकार पाहून प्रेक्षक मालिकेवर आणि मेकर्सवर संतापले आहेत.
"पूर्वी गोष्टी वेगळ्या होत्या. आता लोक जागरुक झाले आहेत", "मालिकेत दाखवलेला रोमान्स नसून अत्याचार आहे", "टीआरपीसाठी काहीही करू नका' अशा प्रतिक्रिया आता प्रेक्षक देत आहेत. याच मालिकेचं मराठी रिमेक स्टार प्रवाहवर सुरू आहे. स्टार प्रवाहवर नव्याने सुरू झालेली मालिका 'सुना येती घरा' ही याच मालिकेचा रिमेक आहे. यात अभिनेते अशोक शिंदे आणि दीपा परब मुख्य भूमिकेत आहेत. आता या मालिकेतही तीच कथा दाखवण्यात येणार का की यात बदल करण्यात येणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.
पैसे मिळाले तर पुन्हा बैलासमोर नाचशील का? क्षणाचाही विचार न करता गौतमी पाटीलने दिलं उत्तर, म्हणते- भाई...