वकील, तज्ज्ञ घेऊन ठाकरे गट मोठ्या निर्णयाच्या तयारीत; बंडखोरांना सर्वात मोठा दणका; थेट…
GH News June 18, 2026 03:12 PM

राज्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना आता वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आला होता. त्यानुसार दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र ज्या 6 खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चा सुरू आहेत, तेच खासदार या बैठकीला अनुपस्थित राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पक्षाने व्हीप जारी करूनही खासदार बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे आता त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची तयारी सुरू करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनुपस्थित खासदारांना आजच नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नोटिशीमध्ये बैठकीला अनुपस्थित राहण्यामागचे कारण स्पष्ट करण्यास सांगितले जाणार आहे.

प्रत्येक खासदाराकडून लेखी उत्तर मागवले जाणार असून त्यासाठी काही तासांचा कालावधी दिला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला असून पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.