ठाकरे गटाचा अ‍ॅक्शन प्लान तयार, आधी नोटीस आणि नंतर… उद्धव ठाकरेंचे अनिल देसाईंना सतत फोन
Tv9 Marathi June 18, 2026 04:45 PM

शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी फुट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार वेगळा गट तयार करत आहेत. तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले. दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओम बिर्ला यांची राजस्थानमध्ये भेट घेतली. त्यानंतर दिल्लीमध्ये प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेना ठाकरे गटाकडून आपल्या सर्व खासदारांना व्हिप बजावण्यात आले. आज बैठक पार पडली. या बैठकीत 6 खासदारांनी दांडी मारली. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट आहे. हे सर्व 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळ्याला लागली आहेत. व्हिप बजावल्यानंतरही बैठकीस गैरहजर असलेल्या खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तात्काळ त्यांच्या कारवाईची प्रक्रिया देखील सुरू झाली. कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावली जाणार आहे.

जे खासदार व्हिप बजावल्यानंतरही बैठकीस अनुपस्थितीत राहिली, अशा खासदारांना पक्षाकडन कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार. यादरम्यानच मोठी घडामोड पुढे येत आहे. 6 खासदारांनी आपला गट तयार केला आहे. गट स्थापन केल्याचे पत्रही त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे खासदार ठाकरे गटाचे असल्याचेही स्पष्ट होत आहे.

राजाभाऊ वाजे, अनिल देशमुख, संजय राऊत आणि विनायक राऊत आहेत, हे दिल्लीतील बैठकीला उपस्थित आहेत. व्हिप बजावूनही बैठकीस हजर न राहिलेल्या खासदारांना आजच नोटीस पाठवण्यात येणार आहे. मसुदा तयार केला जाईल. या प्रकरणात ठाकरेंची सेना थेट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे. खासदारांवर कायदेशीर कारवाई होईल. उद्धव ठाकरे यांचे सतत अनिल देशमुखांना फोन सुरू असल्याची माहिती मिळतंय.

गेल्या तासभरापासून शिवसेना ठाकरे गटाची बैठक दिल्लीत सुरू आहे. बंडखोरी करणाऱ्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्नही शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला. यासर्व घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे हे मुंबईत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे हे दिल्लीत ठाण मांडून आहेत. या बंडखोरी केलेल्या 6 खासदारांच्या संपर्कात श्रीकांत शिंदे असल्याचे कळतंय. खासदारांसोबत सतत ते संवाद साधत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.