'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून अर्जुनची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता रोहित परशुराम 'कृष्णाईच्या लेकी' या नव्या मालिकेतून ‘शंकर’ हे दमदार पात्र साकारताना दिसणार आहे . या भूमिकेच्या तयारीबद्दल, रोहितने काही किस्से सांगितले. " कमळी च्या सेटवर मी आदित्यला, म्हणजेच बंड्याला, सहज भेटायला गेलो होतो. त्यावेळी अनिकेत साने दिग्दर्शक झी मराठीवर नवीन मालिका घेऊन येत आहेत असं समजलं. आणि त्यांच्या नवीन मालिकेच्या ऑडिशन्स सुरू होत्या. मी लगेच सरांना भेटलो, ऑडिशन दिली. त्यानंतर अनेक राऊंड्स ऑफ ऑडिशन्स झाले, सीन वर्क झालं आणि अखेर झी मराठीने मला पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाचा भाग बनवलं.
रोहित पुढे म्हणाला, 'मी कोल्हापुरी भाषा आणि त्याचा लहेजा शिकण्याचा प्रयत्न करतोय. त्यासोबतच भरपूर व्यायाम, योग्य आहार आणि नियमित दिनचर्या पाळतोय. स्क्रिप्ट आणि स्क्रिनप्ले यांचं सखोल वाचन करतोय. साताऱ्यासोबत माझं एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं आहे आणि या मालिकेचा मुहूर्तही साताऱ्यात झाला. त्यामुळे आनंद, उत्सुकता आणि भावुकता अशा अनेक भावना मनात घेऊन मी पहिल्या दिवसाचं शूटिंग केलं.
View this post on InstagramA post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत, त्या दिवशी मी अक्षरशः मारुतीरायाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली की मला ही मालिका मिळू दे. ताईंच्या प्रोजेक्टमध्ये आपण फक्त हातात भाला घेऊन जरी उभे असलो, तरीही मला सार्थक झाल्यासारखं वाटलं असतं. त्यांच्यासोबत सेटवर वावरताना मला माझा संपूर्ण प्रवास आठवतो आणि खरंच मेहनतीला देव, फळ देतो . अशा दिग्गज अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासोबतचा प्रत्येक सीन माझ्यासाठी एक शिकण्याचा अनुभव असणार आहे."
'लगान' फेम मराठी अभिनेत्रीने वयाच्या ६०व्या वर्षी फेसबुक फ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; म्हणते- फक्त ७५ दिवसात...