Maharashtra Politics: ठाकरेंच्या विश्वासू खासदारांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? धक्कादायक कारण आलं समोर
Saam TV June 18, 2026 06:45 PM
  • ठाकरेंच्या बंडखोर खासदारांचा चार पानी ठराव समोर आला

  • काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची भीती ठरावात व्यक्त केली

  • हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्ष नेतृत्वावर आरोप झाले

  • खासदारांनी थेट शिंदेसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचा दावा

गिरीश कांबळे, मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील बंडखोर खासदारांनी पक्ष सोडण्यापूर्वी मंजूर केलेल्या चार पानी ठरावातील धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या ठरावात पक्ष नेतृत्वावर गंभीर आक्षेप घेत काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरणाची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

ठरावानुसार, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारधारेपासून भरकटली असून पक्षाची मूळ भूमिका आणि वैचारिक दिशा बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी स्थापन झालेली नव्हती, असे स्पष्टपणे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

Operation Tiger Update : 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाले का? शिंदेंसेनेच्या बड्या नेत्याचा धक्कादायक दावा, म्हणाले...

याचबरोबर, खासदारांनी भविष्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासाठी खासदारांनी संजय राऊत यांनी तृणमूल काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे केलेल्या वक्तव्याचा संदर्भही ठरावात दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत गंभीर शंका निर्माण झाल्याचे ठरावात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वावरील विश्वास संपुष्टात आल्याचे कारण देत बंडखोर खासदारांनी वेगळा निर्णय घेतल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

'ऑपरेशन टायगर'चा पेपर मातोश्रीवर कसा फुटला? इनसाईड स्टोरी समोर; खासदाराच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा

दरम्यान, या संपूर्ण घडामोडीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बंडखोर खासदारांनी स्वतःला स्वतंत्र गट म्हणून घोषित केलेले नाही. मंजूर केलेल्या ठरावानुसार त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या ‘स्वतंत्र गट’ या दाव्यापेक्षा त्यांच्या ठरावानुसार हा थेट विलिनीकरणाचा निर्णय असल्याचे स्पष्ट होत आहे.

Operation Tiger : त्या ६ खासदारांना Y+ सुरक्षा, ठाकरेसेना आक्रमक; बीड, परभणीसह राज्यभर बंडखोर खासदारांविरोधात आंदोलन | VIDEO
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.