FIFA World Cup: हॅरी केनने गोलच्या बाबतीत ख्रिस्तियानो रोनाल्डोला टाकलं मागे, 60 वर्षानंतर असं घडलं
GH News June 18, 2026 08:13 PM

England beat Croatia: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या एल गटात इंग्लंडचा सामना क्रोएशियाशी झाला. या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाला 4-2 ने लोळवलं. इंग्लंडच्या विजयात कर्णधार हॅरी केनचा मोठा हातभार होता. त्याने त्याने चार गोल पैकी दोन गोल मारले. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात दोन गोल मारून हॅरी केनने मेस्सी, एम्बाप्पे आणि हलांडसारख्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. या खेळाडूंनी आपआपल्या संघांसाठी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दोन किंवा त्यापेक्षा गोल मारले आहेत. दुसरीकडे, फिफा वर्ल्डकप स्पर्धेत गोल मारण्याच्या बाबतीत हॅरी केनने ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकलं आहे. त्याच्यापेक्षा वेगाने गोल मारण्यात यशस्वी ठरला आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोपेक्षा वेगाने गोल मारला!

ख्रिस्तियानो रोनाल्डा आणि मेस्सी हे दोघंही सर्वाधिक फीफा वर्ल्डकप खेळणार खेळाडू आहेत. या दोघांनी सहा फिफा वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेतला आहे. पण सहा फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 23 सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने फक्त 8 गोल मारले आहेत. या बाबतीत हॅरी केन त्याच्या पुढे निघून गेला आहे. हॅरी केनचा हा तिसरा फिफा वर्ल्डकप आहे आणि त्याने 10 गोल मारले आहेत. फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील इंग्लंडच्या पहिल्याच सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे पुढे यात भर पडणार यात शंका नाही.

60 वर्षानंतर घडलं असं

हॅरी केनने क्रोएशियाविरुद्ध खेळताना 12व्या आणि 42 व्या मिनिटाला दोन गोल मारले. तर बेलिंघमने 47 व्या आणि रसफोर्डने 85व्या मिनिटाला गोल मारला. तर क्रोएशियाकडून 36व्या आणि पहिल्या हाफच्या एक्स्ट्रा टाईममध्ये दुसरा गोल मारला. इंग्लंडने हॅरी केनच्या नेतृत्वात क्रोएशियाला 4-2 ने पराभूत केलं. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 60 वर्षानंतर असं घडलं आहे. इंग्लंडने 4-2 ने सामना जिंकला. यापूर्वी 1966 मध्ये झालं होतं. तेव्हा इंग्लंडने जर्मनीला 4-2 ने मात दिली होती.

हॅरी केन इंग्लंडचा टॉप गोल स्कोरर ठरला आहे. त्याने गॅरी लिंकरच्या गोलशी बरोबरी केली आहे. त्याने तीन वेगवेगळ्या फीफा वर्ल्डकप स्पर्धेत एक किंवा त्याहून अधिक गोल मारले आहेत. केनने 2018 मध्ये सहा गोल, 2022 मध्ये 2 गोल आणि 2026 मध्ये 2 गोल मारले आहेत. इंग्लंडसाठी तीन वेगवेगळ्या वर्ल्डकप स्पर्धेत गोल मारणाऱ्या डेविड बेकहमच्या नंतर दुसरा फुटबॉलपटू ठरला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.