Chhatrapati Sambhajnagar: शीतपेयातून पत्नीसह दोन मुलांवर विषप्रयोग; उपचारादरम्यान चारवर्षीय मुलाचा मृत्यू
esakal June 19, 2026 12:45 PM

तामसा: वडिलाने चिमुकल्या मुला- मुलीसह पत्नीवर शीतपेयातून विषप्रयोग केल्याची घटना मनुला बुद्रुक (ता. हदगाव) येथे उघडकीस आली. उपचारादरम्यान एका चारवर्षीय मुलाचा गुरुवारी (ता. १८) मृत्यू झाला. सिद्धार्थ भालेराव असे संशयिताचे नाव आहे.

सिद्धार्थने १३ जूनच्या रात्री कौटुंबिक वादानंतर पत्नी शुभांगी, मुलगी साक्षी (वय ७), मुलगा सुमित (वय ४) या तिघांना शीतपेयातून विषारी औषध दिले.

ता. १४ जूनला तिघांनाही उलट्या होण्यास सुरवात झाल्यानंतर उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. हा प्रकार गावात फारसा चर्चेत नव्हता. पण, सिद्धार्थच्या वडिलांना शंका आली. सून व नातवांनी उलट्या केलेले कपडे शोधल्यानंतर त्यातून विषारी औषधाचा वास आल्याने आजोबांना धक्का बसला.

PM VBRY: तुमच्या खात्यात १५,००० रुपये आले का? आज लाखो जणांना मिळणार थेट लाभ; आधी पात्रता तपासा...

गुरुवारी (ता.१८) सुमितचे उपचारादरम्यान निधन झाले. सिद्धार्थचे वडील नंदकिशोर यांच्या तक्रारीवरून हदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. शुभांगी व साक्षी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. विषप्रयोग करण्याचे कारण समजू शकले नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.