पिंपरी : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय या १३.३ किलोमीटर अंतरातील १२ स्थानकांचे काम जूनअखेर पूर्ण होणार आहे. या मार्गाच्या उद्घाटनाचा आणि प्रवासी सेवेचा निर्णय आता राज्य सरकार घेणार असल्याची माहिती ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल’चे (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांनी गुरुवारी दिली.
Deool Band 2: ‘देऊळ बंद-२’ ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी; प्रवीण तरडे-कैलास वाणी, साईबाबांच्या शिर्डीत संकल्प जाहीरसैनी म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्यात मेट्रो सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात चार ते पाच स्थानके खुली होतील. मधली काही स्थानके वगळून जिल्हा न्यायालयापर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यातील काही स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. काही किरकोळ कामे राहिली असून ऑगस्टपर्यंत कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. डिसेंबरअखेरपर्यंत रेंजहिल्स आणि शिमला ऑफिस ही दोन स्थानके वगळून सर्व स्थानकांची कामे पूर्ण झालेली असतील. या दोन्ही मेट्रो स्टेशनच्या कामासाठी गणेशखिंड रस्ता दिवसा बंद करू शकत नाही. वाहतूक वळवता येणे शक्य नाही. दिवसा अवजड यंत्रणा हाताळताना अडचणी येत असल्यामुळे रात्री काम करावे लागते. स्टेशनचे काम करण्यासाठी खूप कमी वेळ मिळत आहे. त्यामुळे उर्वरित दोन स्थानकांचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.’’ पीएमआरडीएने जुलै २०२७ पर्यंत जरी मुदतवाढ मागितली, तरी सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सैनी यांनी सांगितले. या प्रसंगी ‘पीआयटीसीएमआरएल’चे मुख्य वृत्त अधिकारी मितूल जव्हेरी आणि मुख्य कार्यकारी व्यवस्थापक पराग पहूरकर उपस्थित होते.
पुणे मेट्रोशी संलग्न सेवापुणे मेट्रो एक आणि दोन या दोन्ही मार्गांशी हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो ३) मेट्रोची सेवा संलग्न असणार आहे. मेट्रो तिकीट, जिल्हा न्यायालय येथे जोडणारा पादचारी पूल आणि मेट्रोची वेळदेखील एक आणि दोन मार्गिकेशी संलग्न असणार आहे. मेट्रो तीन सकाळी सहा ते रात्री १२.३० पर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्या दोन्ही मार्गिकांच्या वेळापत्रकानुसार मेट्रो तीनचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.
स्वदेशी बनावटीच्या मेट्रो ट्रेनहिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवर तीन डब्यांची मेट्रो धावणार आहे. ही ट्रेन चार्जिंग पॉइंट, एलईडी दिवे, दिव्यांगांसाठी बसण्याची विशेष सुविधा आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असणार आहे. ट्रेनची प्रवासी क्षमता एक हजार असून एकूण २२ ट्रेन असतील. आतापर्यंत १९ ट्रेन दाखल झाल्या असून आणखी तीन ट्रेन पुढील काही दिवसांत दाखल होतील. ट्रेन श्रीसिटी चेन्नईमधून दाखल झाल्या असून, सर्व स्वदेशी बनावटीच्या आहेत.
डिजिटल तिकीट प्रणालीमेट्रो प्रशासन आधुनिक डिजिटल तिकीट प्रणाली उपलब्ध करून देणार आहे. प्रवाशांना व्हॉट्सॲप, क्यूआर कोड, मोबाइल ॲप आणि ‘पुणे कार्ड’ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’द्वारे (एनसीएमसी) तिकीट काढता येणार आहे. ‘एनसीएमसी’ कार्डद्वारे पुणे मेट्रोसह देशभरातील सर्वच मेट्रो स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी वापरता येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.
Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा.. स्थानकातून थेट कंपनीत प्रवेशमेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पादचारी पूल (एफओबी) बांधले आहेत. पण, ज्या पादचाऱ्यांना रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला जायचे आहे, त्यांनादेखील सुरक्षित रस्ता ओलांडता यावा, यासाठी वाकड चौक मेट्रो स्टेशनसह काही स्टेशनवर पादचारी पूल बांधले आहेत. या पुलावर जाण्यासाठी सरकता जिना उपलब्ध करून दिला आहे. मेट्रोचे तिकीट न काढताही त्यांना पादचारी पुलाचा वापर करता येणार आहे. मेट्रो स्थानकातून थेट कंपनीपर्यंत पादचारी पूल जोडण्यासाठी दहा आस्थापनांचा प्रस्ताव आला आहे. यामध्ये कंपन्या, रुग्णालये आणि विविध आस्थापनांचा समावेश आहे. त्यातील आतापर्यंत तीन कंपन्यांना पादचारी पूल जोडला आहे.