मुंबई : मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 49 व्या एजीएममध्ये जिओच्या आयपीओबाबत मोठी घोषणा केली आहे. बाजार जानकारांच्या मते जिओचा आयपीओ भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ असेल. मुकेश अंबानी म्हणाले की ‘Jio Platforms च्या संचालक मंडळानं DRHP ला मंजुरी दिली आहे. आजच ते सेबीकडे फाईल केलं जाईल. हा माझ्यासाठी आणि रिलायन्स कुटुंबासाठी, शेअरधारकांसाठी भावनिक क्षण आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सच्या बोर्डानं आयपीओसाठी सेबीकडे फाईल केल्या जाणाऱ्या डीआरएचपीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार 10 रुपये दर्शनी किंमत असलेले 27 कोटी शेअर जारी केले जातील. इश्यू प्राइस नंतर निश्चित केली जाणार आहे.
मुकेश अंबानी म्हणाले की आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी Jio IPO प्रक्रियेच नेतृत्त्व करत आहेत. ते पुढे म्हणाले की Jio ची प्रस्तावित लिस्टिंग भारत जागतिक क्षमता, जागतिक पातळी, जागतिक मूल्य असलेली तंत्रज्ञान कंपनी भारत बनवू शकतो हे जगाला दाखवून देईल. मुकेश अंबानी पुढे म्हणाले की तुम्हाला आणि गुंतवणूकदारांना विश्वास देतो की जिओचं भविष्य शानदार असेल.
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आणि जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी यांनी त्यांच्या संबोधनात म्हटलं की जिओचा यूजरबेस 524 दशलक्ष सबस्क्रायबर्सच्या पुढं गेला आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम ऑपरेटर आहे. जीओचा 5G सबस्क्रायबर बेस 268 दशलक्षच्या पुढे पोहोचला आहे. आकाश अंबानी म्हणाले की Jio Platforms ची FY26 मध्ये 1,46,885 कोटी रुपयांची उलाढाल होती. वार्षिक आधारावर ती 14.6 टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचा नफा 30 हजार कोटींच्या पुढे पोहोचला आहे. वार्षिक आधारावर त्यात 15.1 टक्के ग्रोथ झाली आहे. सॅटेलाईट कनेक्टिव्हीटीसाठी ग्राऊंड स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं.
जिओच्या आयपीओच्या माध्यमातून पूर्णपणे नवे शेअर जारी केले जातील. यातून मिळणारी रक्कम जिओच्या 5G नेटवर्क विस्तार, एआय तंत्रज्ञान, डिजीटल इन्फ्रास्ट्रक्चरला मजबूत करण्यासाठी वापरली जाईल. लिस्टिंगवेळी जिओ प्लॅटफॉर्म्सचं मार्केटकॅप 110 ते 130 अब्ज अमेरिकन डॉलर्स असू शकतं.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)