भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एका तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे मोठी खलबळ उडाली असून, विरोधकांकडून गरीश महाजन यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान यावर आता मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते बुलढाण्यात बोलत होते. सदर फोटो मार्फ केलेला आहे, यासंदर्भात मी उद्या मुंबई तक्रार देखील दाखल करणार आहे. मला माहित नाही हे फोटो कसे मार्फ केले, पण याबाबत निश्चितच मी तक्रार करतोय असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटले कसे असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला होता. गिरीश महाजन यांच्या या वक्त्याचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची चांगलाच समाचार घेतला होता, त्यांनी पत्रकार परिषदेमधून गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. माझ्याकडे फक्त एक दिवसासाठी ईडी, सीबीआय द्या मी गिरीश महाजन यांना फोडून दाखवतो असं राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्या या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
त्यांना काहीपण बोलण्याचा अधिकार आहे. ते नेहमीच बोलतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी फारस लक्ष देत नाही, असं यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे महाजन यांचा फोटो व्हायरल झाल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या व्हायरल फोटो प्रकरणात ते आता लवकरच तक्रार दाखल करणार आहेत.
दरम्यान दुसरीकडे आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? कोणावर हल्लाबोल करणार शिवसेना शिंदे गट की भाजप? याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे.