Latest Marathi Live Updates: महाराष्ट्र, देश-विदेश, राजकारण, क्रीडा ते मनोरंजन; दिवसभरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
esakal June 20, 2026 11:45 AM
Kolhapur Live अमित शहा यांचे पहाटे कोल्हापूर विमानतळावर आगमन, कडेकोट बंदोबस्तात स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज पहाटे सुमारे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोतपल आणि भाजप महानगराध्यक्ष विजय जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.