राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांची लेक रेवती आणि नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र अरुण लखानी हे लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. त्या निमित्त लग्नाच्या विविध सोहळ्यांना,कार्यक्रमांना सुरूवात झाली असून नुकतीच सुप्रिया सुळेंच्या घरी पूजा झाली. कार्यक्रमाचे काही फोटो समोर आले आहेत. (All Photos : Social Media)
रेवती सुळे या शरद पवार यांच्या नात आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा सुप्रिया सुळे यांनी केली. राजकीय वर्तुळात या विवाहाची बरीच चर्चा रंगली. रेवती आणि सांरग यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असून लग्नापूर्वीचे काही विधी, कार्यक्रम नुकतेच पार पडले. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावेळी रेवती आणि सारंग ट्विनिंग करत सुरेख पिवळेया पोशाखात दिसले. तर वधूमाय सुप्रिया सुळेंनेही पिवळ्या रंगाची साडी नेसली होती.
सुप्रिया व सदानंद सुळे या दोघांना रेवती आणि विजय अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे हिचा तिच्या वडिलांसोबतचा एक फोटोही समोर आला आहे. शरद पवारांची नात असलेल्या रेवतीने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्रातील पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. तिथून तिने मास्टर्स डिग्री मिळवली . पवार कुटुंब, सुप्रिया सुळे यांच्यासारखी आई, असा मोठा वारसा असूनही रेवती सुळे राजकारणापासून दूर असते, फार प्रसिद्धी झोतात नसते.
शरद पवार यांचे होणारे नातजावई, रेवती हिचा होणारा पती सारंग लखानी हे मूळचा नागपूरचा आहेत. ते व्यावसायिक आणि उत्तम बॅडमिंटनपटू तथा विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे ते पुत्र आहेत. सारंग हेही एक उत्तम बॅडमिंटनपटू आहेत. सारंग यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ विश्वराज ग्रुपमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी मॉडर्न हायड्रोजनमध्ये व्यवसाय विकास सल्लागार (बीडीसी) म्हणून काम केलं आहे.