Vastu Shastra : शनिवार आणि मंगळवारी चुकूनही करू नका ही कामं, अन्यथा घरात येईल भयंकर गरिबी
Tv9 Marathi June 21, 2026 01:45 AM

हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक वार कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित असतो. जसं की सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असतो. मंगळवार हा भगवान हनुमान आणि देवींना समर्पित असतो. गुरुवात हा भगवान दत्तांना समर्पित असतो. शुक्रवार हा देवींना समर्पित असतो. शनिवार हा शनी महाराजांना समर्पित असतो, तर रविवार हा सूर्य देवतेला समर्पित असतो. प्रत्येक वाराचं आपलं एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे विशिष्ट वारी विशिष्ट कामे केल्यास त्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकतं, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. ज्या प्रमाणे विशिष्ट वारी विशिष्ट कामे केली पाहिजेत त्याच प्रमाणे काही कामे अशी देखील असतात की ती एका विशिष्ट वारी करू नयेत, त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. आज आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, जी कामं तुम्ही चुकूनही मंगळवारी किंवा शनिवारी करू नयेत, यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

वास्तुशास्त्रानुसार मंगळवार हा दिवस भगवान हनुमान आणि देवी मातेला समर्पित आहे. अशी काही कामे आहेत, ते मंगळवारी करणं अशुभ मानलं जातं. जर तुम्ही या दिवशी ही कामं केली तर तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुमच्या हातात पैसा टिकत नाही. मंगळवारी कधीही मिठाची खरेदी करू नये, किंवा कोणाला मीठ देऊ पण नये, यामुळे घरात गरिबी येते असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर मंगळवारी पैशांचा व्यवहार करणं टाळावं म्हणजे मंगळवारी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये, कारण तुम्ही जर मंगळवारी एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेतलं तर ते आयुष्यभर फिटत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

वास्तुशास्त्रानुसार शनिवार हा भगवान शनी देव यांना सर्मित आहे. त्यामुळे शनिवारी देखील काही कामं करण्यापासून वाचलं पाहिजे, जर तुम्ही ही कामं शनिवारी केली तर घरात शनीदोष निर्माण होण्याची शक्यता असते. ज्या प्रमाणे मंगळवारी मिठाची खरेदी करू नये, त्याचप्रमाणे शनिवारी देखील मिठाची खरेदी करू नये, तसेच शनिवारी एखादा गरीब गरजू व्यक्ती तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आला तर तुमच्या ताकदीप्रमाणे त्याला दान करावं, परंतु त्याला कधीही खाली हात पाठवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.