नागेश आष्टीकरच्या माणसाने जीवे मारण्याची धमकी दिली; सुषमा अंधारेंनी नंबर शेअर केला, म्हणाल्या, 'गद्दारी करून पळून जाणाऱ्यांना Y+ सुरक्षा देऊन सरकार आता..'
वेदांत नेब June 21, 2026 02:13 AM

Sushma Andhare on Nagesh Patil Ashtikar: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या माणसाने जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करत नागेश आष्टीकर यांच्या माणसाने ज्या नंबरवरून फोन करत धमकी दिली होती, तो नंबर शेअर केला आहे आणि सरकारला आता खून करण्यापर्यंतची सवलत देणार आहे का, असाही विचारणा केली.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नागेश आष्टीकर यांच्या माणसाने या फोन नंबरवरून आता मला जिवे मारण्याची धमकी दिली. गद्दारी करून पळून जाणाऱ्यांना Y+ सुरक्षा देऊन सरकार आता खून करण्यापर्यंतची सवलत देणार आहे का? आष्टीकर, मी तुमच्या धमकीचं स्वागत करते. Challenge accepted असं त्यांनी म्हटलं आहे. सुषमा अंधारे यांनी फुटीर खासदारांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. नागेश आष्टीकर यांना सुद्धा त्यांनी ओपन चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे सुषमा अंधारे विरुद्ध फुटीर खासदार असा सुद्धा संघर्ष रंगला आहे.

तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा फुटीर खासदारांपैकी एक असलेल्या नागेश आष्टीकर पाटील (Nagesh Ashtikar Patil) यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर (Krishna Ashtikar) यांनी आपण अजूनही ठाकरे गटासोबत असल्याचा दावा केला आहे. मी माझ्या वडिलांच्या संपर्कात नाही, त्यांच्या शिंदे सेनेत जाण्याच्या निर्णयाविषयी मला कोणतीही कल्पना नव्हती, असे कृष्णा आष्टीकर यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी कृष्णा आष्टीकर यांना आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी स्वत:च्या वडिलांचे पिंडदान करुन दाखव, असे आव्हान दिले.  

सुषमा अंधारे यांना कृष्णा आष्टीकर यांच्या अजूनही ठाकरे गटात असल्याच्या दाव्याविषयी विचारण्यात आले. कृष्णा आष्टीकर हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असेल त्याने उद्या बापाचं पिंडदान करुन दाखवावं आणि स्वत:च्या बापाच्या प्रतिमेला जोडे मारुन दाखवावेत, मग आम्ही म्हणू की, तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहात. तुम्ही कोणाला शहाणपण शिकवताय. बाप तसा बेटा आहे, अशी आगपाखड सुषमा अंधारे यांनी केली.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.