आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 जून 2026
esakal June 21, 2026 10:45 AM

पंचांग -

रविवार : निज ज्येष्ठ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६ सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय दुपारी १२.०३, चंद्रास्त रात्री १२.२४, भानुसप्तमी, दक्षिणायनारंभ, सौर वर्षा ऋतू प्रारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ ३१ शके १९४८.

दिनविशेष -

  • २००२ - भारताने बालासोर येथून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चंडीपूर येथे ‘नाग’ या रणगाडाभेदी दोन क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली.

  • २००७ - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आणि ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे (सुपरसॉनिक) ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र लष्करात दाखल.

  • २००९ - साईना नेहवालने चुरशीच्या लढतीत प्रतिष्ठेच्या इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.