Team India Upcoming ODI Match List 2026: भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका ३-० अशा फरकाने सहज जिंकली आहे. या मालिकेतील चेन्नईला झालेला तिसरा आणि अखेरचा वनडे सामना भारताने ९ विकेट्सने जिंकला.
ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची होती. या मालिकेपासून दोन्ही संघांची आगामी २०२७ वनडे वर्ल्ड कपसाठीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पुढचे एक वर्ष वनडे क्रिकेटसाठी महत्त्वाचे असणार आहे. कारण ऑक्टोबर - नोव्हेंबर २०२७ मध्ये वनडे वर्ल्ड कप होणार आहे, त्यासाठी सर्वच संघ दमदार तयारी करताना दिसतील.
IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारणभारतीय चाहत्यांसाठी सध्या वनडे मालिका आणखी एका कारणासाठी खास ठरत आहे. कारण भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli & Rohit Sharma) हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील केवळ वनडे प्रकारात सक्रिय आहेत.
तसेच ते त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. त्यांनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या दोघांनाही केवळ वनडेत खेळताना पाहायला मिळते. त्यातही दुखापतीमुळे विराट अफगाणिस्तानविरुद्ध खेळला नव्हता.
आता अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका संपली असून आता अनेक चाहत्यांना पुढची वनडे मालिका कधी आहे, असा प्रश्न पडला असेल. तर भारताचा संघ पुढच्या काहीच दिवसात युरोप दौऱ्यावर जाईल. भारताचा वनडे संघ आता जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळताना दिसणार आहे. त्याआधी भारताच्या टी२० संघाला आयर्लंडविरुद्ध २६ आणि २८ जून रोजी बेलफास्ट येथे सामने खेळायचे आहेत. तिथून भारताचा संघ इंग्लंडला जाईल.
इंग्लंडमध्ये आधी १ ते ११ जुलै दरम्यान भारतीय संघ टी२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर वनडे मालिकेला १४ जुलैपासून सुरुवात होईल. १४ ते १९ जुलैपर्यंत ही वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
या वनडे मालिकेत विराट कोहली खेळण्याची दाट शक्यता आहे. पण त्याआधी त्याला फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करावी लागणार आहे. तो मांडीच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्ध खेळला नव्हता. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी येत्या दोन दिवसात भारतीय संघाची घोषणा होईल, अशी माहिती वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिलने दिली आहे.
Team India Schedule: IPL चा थरार संपला, आता भारतीय संघाचे कधी सुरू होणार सामने? पाहा पुढील १० महिन्यांचे वेळापत्रक भारताचा आयर्लंड दौरा (टी२० मालिका)२६ जून - पहिला टी२० सामना, बेलफास्ट (संध्या. ७.३० वा)
२८ जून - दुसरा टी२० सामना, बेलफास्ट (संध्या. ७.३० वा)
१ जुलै - पहिला टी२० सामना, चेस्टर-ल-स्ट्रीट (रा. १० वा.)
४ जुलै - दुसरा टी२० सामना, मँटेस्टर (संध्या. ७.०० वा.)
७ जुलै - तिसरा टी२० सामना, नॉटिंगघम (रा. १० वा.)
९ जुलै - चौथा टी२० सामना, ब्रिस्टोल (रा. १० वा.)
११ जुलै - पाचवा टी२० सामना, साऊथॅम्पटन (रा. ११ वा.)
१४ जुलै - पहिला वनडे सामना, बर्मिंगघम (दु. ३.३० वा.)
१६ जुलै - दुसरा वनडे सामना, कार्डिफ (संध्या. ५.३० वा.)
१९ जुलै - तिसरा वनडे सामना, लॉर्ड्स (दु. ३.३० वा)