Live Streaming And Match Details IND A vs SL A Final: भारतीय अ संघ(IND A) सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून त्रीदेशीय मालिकेचा अंतिम सामना आज खेळला जाणार आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा अ संघ जेतेपदासाठी श्रीलंका अ संघाशी भिडणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात सगळ्यांचे लक्ष १५ वर्षीयवैभव सूर्यवंशीवर(Vaibhav Sooryavanshi) असणार आहे.
आयर्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी स्वतःला सिद्ध करण्याची ही त्याच्यासाठी शेवटची संधी मानली जात आहे. या मालिकेत त्याची कामगिरी मिश्र राहिली असली, तरी अंतिम सामन्यात मोठी खेळी करण्याची त्याच्याकडे संधी आहे.
या स्पर्धेतील भारत आणि श्रीलंका यांच्यातील अखेरचा साखळी सामना खेळापेक्षा इतर कारणांनी जास्त चर्चेत राहिला होता. श्रीलंकन खेळाडूंनी वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे यांच्यावर स्लेजिंग केल्यामुळे मैदानावर तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंची वर्तणूक कशी राहते याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी पुन्हा अपयशी, श्रीलंकन गोलंदाजाने पुन्हा कस केलं out पाहा?श्रीलंकेतील संथ खेळपट्ट्यांवर वैभवला अपेक्षित वेगाने धावा करता आलेल्या नाहीत. या मालिकेत त्याने १४, ४४, २१ आणि ३८ अशा खेळी केल्या आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात परिस्थितीनुसार खेळ करत मोठी खेळी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
वैभवशिवाय कर्णधार तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांच्याकडूनही भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. ऋतुराजने एका शतकासह चार सामन्यांत २३४ धावा केल्या आहेत. प्रियांश आर्या आणि कुमार कुशाग्र यांनीही चांगली कामगिरी केली असून त्यांच्याकडून सातत्याची अपेक्षा असेल. गोलंदाजीत अर्शद खान, यश ठाकूर, निशांत सिंधू, विप्राज निगम आणि अनुकूल रॉय यांना निर्णायक योगदान द्यावे लागणार आहे.
सामना कधी आणि कुठे पाहाल?भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील अंतिम सामना रविवारी २१ जून रोजी सकाळी १० वाजता रंगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी लिव्ह अॅप आणि वेबसाईटवर पाहता येणार आहे.
विशेष म्हणजे हा सामना संपल्यानंतर वैभव सूर्यवंशी थेट भारतीय वरिष्ठ संघासोबत आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याची निवड झाली असून, संधी मिळाल्यास तो सर्वात कमी वयात भारतासाठी खेळण्याचा विक्रमही मोडू शकतो. त्यामुळे आयर्लंडला रवाना होण्यापूर्वी आजचा अंतिम सामना वैभवसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
IND A vs SL A: वैभव सूर्यवंशी भारतीय अ संघाकडून खेळताना १४ धावांवरच आऊट; कशी गेली विकेट? दोन्ही संघाची प्लेईंग ११भारत अ (India A): टिळक वर्मा (कर्णधार), प्रियम गर्ग/प्रियांश आर्या, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), सुर्यांश शेडगे, निशांत सिंधू, विप्रज निगम, अनुकूल रॉय, अंशुल कंबोज, यश ठाकूर.
श्रीलंका अ (Sri Lanka A): सहान अराचिगे (कर्णधार), निरोशन डिकवेला (विकेटकीपर), अविष्का फर्नांडो, नुवानिदु फर्नांडो, सदिरा समरविक्रमा, चमिका करुणारत्ने, विजयकांत व्यासकांत, रविंदु फर्नांडो, विशेन हलमगे, दुलाज समुदिता, मोहम्मद शिराज.