महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यरात्रीच्या राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतला आहे. शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘ऑपरेशन टायगर’ फेल करण्यासाठी रात्रीच्या अंधारात एक महत्त्वाची चाल खेळली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांची समजूत काढण्यासाठी दोन मोठ्या नेत्यांना तातडीने पुण्याला रवाना करण्यात आले.
आमदार वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील हे दोन्ही नेते मध्यरात्री पुण्यात पोहोचले. त्यांनी लगेच ओमराजे निंबाळकरयांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सूचनेनुसार ही मनधरणी मोहीम राबवण्यात येत असल्याचे समजते. सध्या ओमराजे निंबाळकर यांचा कल कोणत्या बाजूला राहील, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत काही आमदार आणि खासदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाने याला रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न सुरू केले आहेत. ओमराजे निंबाळकर यांची महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांना सांभाळण्यासाठी ठाकरे गटाने उच्चस्तरीय पातळीवर डाव टाकला आहे.
वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी ओमराजे यांच्याशी सुमारे दीड ते दोन तास चर्चा केल्याचे सांगण्यात येते. या भेटीत पक्षीय एकतेचा मुद्दा, भविष्यातील राजकीय रणनीती आणि ओमराजे यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांचा विचार करण्यात आला. ठाकरे गटातील वरिष्ठ नेते सांगतात की, ओमराजे हे पक्षाचे जुने आणि विश्वासू कार्यकर्ते आहेत. त्यांना फोडण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.
Operation Tiger: ठाकरेंचे खासदार फोडणारा मास्टरमाईंड कोण? समोर आलं मोठं नाव; थेट दिल्ली कनेक्शन, आधी 'शस्त्र विक्रेता' म्हणूनही चर्चेतदरम्यान, या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही बाजू एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काही नेते ‘ऑपरेशन टायगर’ हे फक्त अफवा असल्याचे सांगत असताना, दुसऱ्या बाजूला रात्रीच्या बैठका आणि नेत्यांच्या हालचालींमुळे राजकीय तणाव वाढला आहे.
उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रकरणावर नजर ठेवली असून, आवश्यकता भासल्यास आणखी वरिष्ठ नेत्यांना पाठवण्याची तयारी ठेवली आहे. ओमराजे निंबाळकर यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याने आज उद्या त्यांच्या अधिकृत भूमिकेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Uddhav Thackeray: राज्यातही होणार ‘ऑपरेशन टायगर’, ठाकरेंकडे २०२९ मध्ये उमेदवारही उरणार नाहीत; भाजप आमदाराचा दावा