Marathi Actress Wedding: मराठी मनोरंजनसृष्टीतील 'फर्स्टक्लास दाभाडे', 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam) अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री तृप्ती शेडगेने (Trupti Shedge) लग्नगाठ बांधली आहे. लोकप्रिय दिग्दर्शकासोबत तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. लोकप्रिय दिग्दर्शक रोहित पवार याच्यासोबत ती लग्न बंधनात अडकली आहे. 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ' या चित्रपटात तृप्तीने अभिनेता अमेय वाघच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तर फर्स्टक्लास दाभाडे मध्ये तिच्या 'मंजू' या पात्राची ही चर्चा झाली. तिच्या लग्नाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तृप्ती आणि रोहित यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ' या चित्रपटात अमेय वाघच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री तृप्ती शेडगे हिने दिग्दर्शक रोहित पवार याच्याशी लग्न केला आहे. तृप्तीचा पतीरोहीखा देखील मराठी कला विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. 'मन झालं बाजींद', 'कारभारी लयभारी' 'देव माणूस', 'मिसेस मुख्यमंत्री', 'लागिर झालं जी' 'मुलगी झाली हो ' या मालिकांसाठी काम केलं आहे.
दोघांनीही वैवाहिक आयुष्यला सुरुवात केली असून त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. खरंतर या दोघांना शुभेच्छा देणारी एक पोस्ट 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' या चित्रपटाच्या टीमने शेअर केली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट आजच टेलिव्हिजनवर प्रसारित केला जाणार आहे. एक जानेवारी रोजी तिचा हा चित्रपट चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.
View this post on Instagram
'फर्स्ट क्लास दाभाडे ' मधील मंजू आणि क्रांतीज्योती विद्यालय फेम डोली म्हणजेच आपली तृप्ती आता खऱ्या आयुष्यात सुपरहिट संसार सुरू करतेय! लग्न बंधनात अडकलेल्या तृप्तीला या नव्या आणि सुंदर प्रवासासाठी चलचित्र मंडळी परिवाराकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा! अशी ही पोस्ट या चित्रपटाच्या टीमने केली. या पोस्टवर तृप्तीने संपूर्ण टीमचा आभार मानले आहेत.