चीनकडून युद्धाची जय्यत तयारी? विमाने, युद्धनौका हल्ल्यासाठी तयार, जग पुन्हा युद्धाकडे?
GH News June 21, 2026 07:10 PM

गेल्या काही काळापासून चीन आणि तैवान यांच्या तणावाचे वातावरण आहे. अशातच आता तैवानच्या आसपास चीनच्या लष्करी हालचाली वाढत आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सकाळी सांगितले की, ‘तैवानच्या परिसरात 2 चीनी लष्करी विमाने, 8 चीनी नौदलाची युद्धनौका आणि 4 सरकारी जहाजे आढळून आली आहेत.’ चीनच्या या कृत्यानंतर तैवानच्या सैन्याने या सर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ची 2 विमाने आणि पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही (PLAN) च्या 8 युद्धनौका तैवानच्या आसपास कार्यरत असल्याचे दिसून आले. यापूर्वी शनिवारीही चीनचे लष्कर या भागात आढळून आले होते. तैवानने 5 चीनी लष्करी विमाने, 9 युद्धनौका आणि 5 सरकारी जहाजे शोधून काढली होती. यापैकी एक विमान तैवान सामुद्रधुनीतील मध्यरेषा ओलांडून तैवानच्या दक्षिण-पश्चिम एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन मध्ये प्रवेश केले होते. त्यानंतर तैवानच्या सैन्याने तत्काळ प्रतिसादात्मक कारवाई केली.

तैवानकडून पाणबुडींच्या चाचण्या पूर्ण

चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींच्या पार्श्वभूमीवर तैवानही आपली संरक्षण क्षमता मजबूत करण्यावर भर देत आहे. याच महिन्यात तैवानच्या पहिल्या स्वदेशी पाणबुडीने काऊशुंग बंदरातून समुद्री चाचण्यांचा आणखी एक टप्पा पूर्ण केला. अहवालानुसार, ही पाणबुडीची 15 वी समुद्री चाचणी आणि 9 वी डायव्हिंग चाचणी होती. तैवानच्या सागरी सुरक्षा धोरणासाठी ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे.

चीन-तैवान वाद काय आहे?

तैवानच्या प्रश्नावर चीन आणि तैवान यांच्यातील वाद अनेक दशकांपासून सुरू आहे. बीजिंग तैवानला आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानतो आणि भविष्यात त्याचे एकत्रीकरण करण्याचा दावा करतो. तर दुसरीकडे, तैवान स्वतःला स्वतंत्र आणि लोकशाही पद्धतीने चालणारे प्रशासन मानतो. तैवानचे स्वतःची सरकार, सैन्य आणि आर्थिक व्यवस्था आहे. मात्र गेल्या काही वर्षांत चीनने तैवानच्या आसपास लष्करी दबाव वाढवला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून तैवानही आपली संरक्षण तयारी अधिक मजबूत करत आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रदेशात युद्ध पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.