आंध्र प्रदेशातील लोकांचा आवडता नाश्ता म्हणजे पेसरट्टू. हा पदार्थ चविष्ट, कुरकुरीत आणि प्रथिनांनी भरपूर असल्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम मानला जातो. उत्तर भारतात ज्याला मूग डाळीचा चिला म्हणतात, त्यालाच आंध्र प्रदेशात पेसरट्टू असे म्हणतात.
पेसरट्टू म्हणजे काय?‘पेसरा’ या तेलुगू शब्दाचा अर्थ हिरवी मूग डाळ, तर ‘अट्टू’ म्हणजे डोसा. त्यामुळे मूग डाळीपासून तयार होणाऱ्या या डोशाला पेसरट्टू असे नाव पडले आहे.
Moong Dal Palak Idli Recipe: प्रोटीन आणि आयर्नचा भरपूर खजिना; नाश्त्यासाठी बनवा मऊ अन् स्पंजी 'मूग डाळ-पालक इडली' पेसरट्टू बनवण्यासाठी लागणारे साहित्य1 कप हिरवी मूग डाळ
2 टेबलस्पून चणा डाळ
2 टेबलस्पून तांदूळ
1 लहान कांदा (बारीक चिरलेला)
3-4 हिरव्या मिरच्या
2 इंच आले
1 टीस्पून जिरे
1/2 टीस्पून तिखट
चवीनुसार मीठ
तेल
मूग डाळ, चणा डाळ आणि तांदूळ 6 तास पाण्यात भिजत ठेवा.
भिजवलेले मिश्रण मिक्सरमध्ये वाटून गुळगुळीत पीठ तयार करा.
त्यात आले, हिरव्या मिरच्या, जिरे, तिखट आणि मीठ घालून चांगले मिसळा.
गरजेनुसार थोडे पाणी घालून डोश्याच्या पिठासारखे मिश्रण तयार करा.
तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा.
तयार पीठ तव्यावर पातळ पसरवा.
वरून चिरलेला कांदा भुरभुरवा.
दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
गरमागरम पेसरट्टू हिरवी चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.
प्रथिनांनी भरपूर आणि पचायला हलका असलेला पेसरट्टू हा नाश्त्यासाठी एक आरोग्यदायी व स्वादिष्ट पर्याय आहे.