22 जून 2026 पंचांग: दुर्गाष्टमी, आर्द्रा प्रवेश आणि शुभ-अशुभ मुहूर्त जाणून घ्या
esakal June 22, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०२

☀️ सूर्यास्त – १९:०८

चंद्रोदय – १२:५६

⭐ प्रात: संध्या – ०४:५० ते ०६:०२

⭐ सायं संध्या – १९:०८ ते २०:२०

⭐ अपराण्हकाळ – १३:५३ ते १६:३०

⭐ प्रदोषकाळ – १९:०८ ते २१:१८

⭐ निशीथ काळ – ००:१३ ते ००:५६

⭐ राहु काळ – ०७:४० ते ०९:१८

⭐ यमघंट काळ – १०:५६ ते १२:३५

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– १५:५१ ते १७:२९

अमृत मुहूर्त– ०६:०२ ते ०७:४०

विजय मुहूर्त— १४:४६ ते १५:३८

⏳ कार्यसिद्धी वेळा – ०९:३१ ते १०:५६ | १३:५३ ते १९:०८ | २३:२९ ते २४:००

⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:०२ ते ०९:३१ | ११:१६ ते १३:५३ | १९:०८ ते २३:२९

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: १३:०१ ते १९:०३ | ओहोटी: १९:०३ ते २५:०१ | भरती: २५:०१ ते ३१:२४ | ओहोटी: ३१:२४ ते ३७:५१

ग्रहमुखात आहुती – शुक्र (शुभ)

अग्निवास – पृथ्वीवर (दिवसभर)

️ शिववास – २०:०४ पर्यंत श्मशानात असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर गौरीसन्निध असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – ग्रीष्म

मास – ज्येष्ठ

पक्ष - शुक्ल पक्ष

तिथी – अष्टमी (२०:०४ नं.) नवमी

वार – सोमवार

नक्षत्र – उत्तराफाल्गुनी (१४:३२ नं.) हस्त

योग – व्यतीपात (१४:२१ नं.) वरीयान

करण – भद्रा (०८:०९ नं.) बव

चंद्र रास – कन्या

सूर्य रास – मिथुन

गुरु रास – कर्क

दिनविशेष – भद्रा ०८.०९ प., दुर्गाष्टमी, सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश दु.१२.००, स्त्री.पु.चंद्रसूर्ययोग, महिषवाहन, नीरा नाडी, अधिपती शुक्र, सामान्य वृष्टियोग:, (आर्द्राया: प्रथमे पादे क्षीरमश्नाति यो नर: | अपि रोषयुतस्तस्य तक्षक: किं करिष्यति |), अद्यदिनमारभ्य चतुर्दिनपर्यन्तं पायसं भक्षणीयम्‌‍ |, (आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम चरणात सूर्य असताना पृथ्वी रजस्वला होते त्यामुळे त्यापुढील तीन दिवस बी पेरणी, नांगरणी इ. कार्ये करु नयेत), श्रीशुक्लादेवीपूजा (उपवासपूर्वक), शिवपूजन, त्रिलोचनाष्टमी, श्रीतुकामाईमहाराज पुण्यतिथी (येहळेगांव)

✅विशेषभारतासारख्या कृषिप्रधान देशामध्ये पाऊस वेळेवर येणे हा जणू जीवन-मरणाचा प्रश्न असतो. पाऊस उशीरा आला किंवा सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त आला तर होणारे नुकसान अपरिमित असते. अशा पावसाचा अंदाज लावणे वेधशाळेप्रमाणेच जनसामान्यांनाही आवश्यक होऊन बसते.

प्राचीन काळापासून आपल्याकडे ऋषीमुनींनी, अभ्यासकांनी विविध पद्धतींनी पाऊस येण्याचा अंदाज कसा लावावा याविषयी सखोल अभ्यास केलेला आहे. आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. प्रस्तुत व्हिडिओमधून पाहू या अशीच काही निसर्गसूचक लक्षणे, प्राण्यांच्या सवयी ज्यातून पावसाचा अचूक अंदाज लावणे शक्य होते.

https://youtube.com/watch?v=O31AZw8B7RQ&si=gwhs9dXK5aRlby1H

शुभाशुभ दिवस - १४:२१ नं. शुभ दिवस

श्राद्ध तिथी - अष्टमी श्राद्ध

आजचे वस्त्र – पांढरे

स्नान विशेष – वाळा, शिरस, केशर, रक्तचंदन यापैकी कोणतेही पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – शिव कवच स्तोत्राचे पठण आणि ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस तांदूळ, कापूर, मोती, श्वेतवस्त्र, घृताने भरलेला कुंभ दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – नारळ, खोबरं, मांस, स्त्रीसंग

दिशाशूल उपाय – दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा करण्यापूर्वी दूध पिऊन बाहेर पडावे.

चंद्रबळ – मेष , वृषभ , कर्क , सिंह , कन्या , वृश्चिक , धनु , मकर , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.