सोमवार : निज ज्येष्ठ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय दुपारी १२.५५, चंद्रास्त रात्री १२.५८, दुर्गाष्टमी, सूर्याचा आर्द्रा नक्षत्रप्रवेश, वाहन गाढव, अयन करिदिन, भारतीय सौर आषाढ १ शके १९४८.
दिनविशेष
२००३ : वयाच्या ७३ व्या वर्षी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी ‘एसयू ३० एमके आय’ या लढाऊ विमानातून सहवैमानिक म्हणून उड्डाण केले आणि वैमानिकांच्या अनुभवांची प्रचिती घेतली.
२०१६ : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी २० उपग्रह अवकाशात सोडून नवा इतिहास रचला. या उपग्रहांपैकी १७ उपग्रह विदेशी असून, तीन भारतीय उपग्रह आहेत.