Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात पावसाचं दणक्यात पुनरागमन! घाटमाथ्यावरही धुवाधार; पुढील तीन ते चार दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज
esakal June 22, 2026 12:45 PM

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. या पावसामुळे पाण्याअभावी संकटात सापडलेल्या तीन हजार हेक्टरवरील भातरोपांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या बहुतांशी भागात काल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Sindhudurg rain update today) झाला. घाटपायथ्याच्या गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी झाल्या. बहुतांशी भागात पाऊस झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

जिल्ह्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर तीन-चार दिवस पाऊस झाला. १० जूनपासून पावसाने दडी मारली. एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे कडक ऊन यामुळे तीन हजार हेक्टरवरील भात रोपवाटिका संकटात सापडल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांनी भातरोपे जगविण्यासाठी रोपांना पाणी देणे सुरू केले होते. जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते.

Maha Refinery Project : बारसू की नाणार? कोकणातील महाप्रकल्पाचे भवितव्य बदलणार; नव्या प्रस्तावाने राजकीय वर्तुळात चर्चा, जमीन अधिग्रहणाबाबत बावनकुळेंना साकडे

शनिवारी (ता. २०) सायंकाळपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरा काही भागात पावसाचा शिडकावादेखील झाला होता. दरम्यान, आज सकाळपासून पावसाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली. सकाळी कणकवली, कुडाळ तालुक्यांतील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या.

काही भागात जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या. दुपारनंतर जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, देवगड, वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्यांच्या काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. घाटपायथ्याच्या गावांमध्ये दमदार सरी बरसल्या. पावसामुळे संकटात सापडलेल्या भातरोपांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना सुरुवात होणार आहे.

Koyna Dam Security : राज्याला 2 हजार मेगावॉट वीज निर्मिती करणाऱ्या कोयना प्रकल्पाला धोका? दिल्लीहून 'आयबी'चे पथक थेट पोफळीत दाखल, तीन दिवस धरणाची होणार कसून पाहणी २४ जूनपर्यंत 'यलो अलर्ट'

हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. सोमवारी (ता. २२) विजांचा कडकडाट आणि आणि वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिला आहे, तर २३ आणि २४ ला जोरदार पावसाचा अंदाज दिला असून, २४ जूनपर्यंत ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.