England squad for India T20I series 2026 : हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ भारताविरुद्धच्या पाच ट्वेंटी-२० ( ENG vs IND ) सामन्यांच्या मालिकेत मैदानावर उतरणार आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडच्या कसोटी संघाचा सदस्य आहे आणि तिसरी कसोटी संपल्यानंतर अवघ्या ४८ तासांत तो ट्वेंटी-२० मालिका खेळायला उतरेल. त्यासाठी त्याला नॉटिंगहॅम ते चेस्टर-ले-स्ट्रीट असा १५० माईल्सचा प्रवास करावा लागणार आहे. वर्ल्ड कप विजेत्या भारताला टक्कर देण्यासाठी जाहीर केलेल्या १७ वर्षीय संघात २२ वर्षीय जेम्स कोलेस ( James Coles) याची चर्चा आहे. भारतीयसंघाकडूनही वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Sooryavanshi) पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन युवा खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष आहे.
इंग्लंडने पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात ससेक्सचा अष्टपैलू खेळाडू जेम्स कोल्सचा समावेश आहे, परंतु मार्चमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताकडून पराभूत झालेला बहुतांश संघ कायम आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर जॉस बटलरने आपले स्थान कायम ठेवले आहे, तर ३६ वर्षीय लियाम डॉसनला संघात कायम ठेवणे ही आणखी एक उल्लेखनीय बाब आहे.
IPL 2027 TRADE: हार्दिक पांड्याचं नाव, पण रोहित शर्माचा करेक्ट कार्यक्रम! Mumbai Indians ट्रेड विंडोत मोठा डाव टाकायला तयार; वाचा Inside Storyरेहान अहमद, जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, जॉर्डन कॉक्स आणि जोश टंग यांच्यासह ब्रूक हा तिसऱ्या कसोटी आणि ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी निवडलेल्या संघातील सहा खेळाडूंपैकी एक आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील संघातल्या बेन डकेटला डावलले गेलेय, तर जेमी ओव्हरटनही ही मालिका मुकणार आहे.
गेल्या काही हंगामात ससेक्सकडून फ्रँचायझी क्रिकेट आणि इंग्लंड लायन्स संघाकडून प्रभावी कामगिरी केल्यानंतर, २२ वर्षीय कोल्सला पहिल्यांदाच संघात स्थान मिळाले आहे. तो एक डावखुरा फिरकी गोलंदाज असून मधल्या फळीत फलंदाजी करतो. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पहिल्या 'हंड्रेड' लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता आणि लंडन स्पिरिट संघाने त्याला ३,९०,००० पौंडांचा करार दिला आहे.
England T20I squad vs India - हॅरी ब्रूक, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जॉस बटलर, जेम्स कोल्स, जॉर्डन कॉक्स, सॅम कुरन, लाएम डॉसन, विल जॅक्सस साकीब महमूद, आदील राशिद, फिल सॉल्ट, जॉश टंग, ल्युक वूड
India T20I squad vs England - श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी
IPL 2027 Trade : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आणखी एक खळबळ! 'स्टार' खेळाडूला थेट कर्णधारपदाची ऑफर, त्याच्या भूमिकेकडे लक्ष... भारताचा इंग्लंड दौरा टी२० मालिका१ जुलै - पहिला टी२० सामना, चेस्टर-ल-स्ट्रीट (रा. १० वा.)
४ जुलै - दुसरा टी२० सामना, मँटेस्टर (संध्या. ७.०० वा.)
७ जुलै - तिसरा टी२० सामना, नॉटिंगघम (रा. १० वा.)
९ जुलै - चौथा टी२० सामना, ब्रिस्टोल (रा. १० वा.)
११ जुलै - पाचवा टी२० सामना, साऊथॅम्पटन (रा. ११ वा.)