Water Supply : बारामती शहरास उद्यापासून दोन दिवसाआड पाणी
esakal June 23, 2026 02:45 AM

बारामती - शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन सध्या बंद असल्याने आवश्यक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेने मंगळवारपासून (ता. २३) दोन दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी (ता. २३) कसबा, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायण नगर, माळेगाव रोड, हनुमान नगर, सातव वस्ती, शिवाजी नगर, कारभारी नगर, सावतामाळीनगर, साठेनगर, जुना व नवा मोरगाव रोड परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

बुधवारी (ता. २४) म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानगल्ली, समर्थनगर, आमराई, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, साळवेनगर, कॅनॉल रोड परिसर, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सुहासनगर, एस.टी. स्टँड परिसर, जवाहरनगर, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, विजयनगर, साईगणेशनगर, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर आदी परिसरात पाणीपुरवठा केला जाणार आहे.

शहरातील सायली हिल व जळोची येथील जलशुद्धीकरण केंद्रावरुन होणारा पाणीपुरवठा मंगळवारी (ता. २३) तांदुळवाडी गावठाण, सहयोग सोसायटी, निरा कॅनॉल सोसायटी, दुधसंघ सोसायटी या परिसरात पाणीपुरवठा होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी पाणी उपलब्ध होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.