Main Vapas Aaunga Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक चित्रपटांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असली तरी दोन चित्रपट सर्वाधिक चर्चेत आहेत. एकीकडे 'कॉकटेल 2' (Cocktail 2) वादळी कमाई करत आहे, तर दुसरीकडे इम्तियाज अली यांचा 'मैं वापस आऊंगा (Main Vapas Aaunga) हा चित्रपटही प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवत आहे. विशेष म्हणजे ‘कॉकटेल 2’च्या रिलीजमुळे अनेक चित्रपटांचे शो कमी झाले असतानाही ‘मैं वापस आऊंगा’ने नवव्या दिवशी कमाईत तब्बल 128.9 टक्क्यांची झेप घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. (Box Office Collection)
आतापर्यंत 'मी वापस आऊंगा' या चित्रपटाने 18.50 कोटी रुपयांची नेट कलेक्शन केले आहे.परदेशातही या चित्रपटाने 10.75 कोटींची कमाई केली आहे.त्यामुळे या चित्रपटाचे वर्ल्डवाईड कलेक्शन 32.85 कोटींवर पोहोचलं आहे. सध्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम असल्याचे चित्र दिसत आहे. प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी तब्बल 4.35 कोटी रुपयांची कमाई हा चित्रपट करतोय. आठव्या दिवशी ही कमाई 1.90 कोटींवर होती. अवघ्या एका दिवसात या कमाईचा आकडा 128.9% ने वाढला.विशेष म्हणजे आत्तापर्यंतच्या सर्वाधिक एक दिवसीय कलेक्शनपैकी एक हे कलेक्शन ठरलं. पहिल्या दिवसाच्या तुलनेत ही जवळपास चारपट जास्त कमाई आहे.या चित्रपटाविषयी सकारात्मक 'वर्ड ऑफ माऊथ 'मुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय.
इम्तियाज अली दिग्दर्शित ‘मैं वापस आऊंगा’ हा फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र दुसऱ्या आठवड्यात नव्या चित्रपटांच्या स्पर्धेतही 'में वापस आऊंगा'ची पकड कायम आहे. आठव्या दिवशी 1.90 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने नवव्या दिवशी थेट 4.35 कोटींची कमाई करत मोठी झेप घेतली.
‘मैं वापस आऊंगा’ने आतापर्यंत देशांतर्गत 18.50 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. तर ग्रॉस कलेक्शन 22.10 कोटींवर पोहोचले आहे. जागतिक स्तरावर चित्रपटाने 32.85 कोटींचा गल्ला केला आहे. मात्र, हिटचा दर्जा मिळवण्यासाठी अजूनही चित्रपटाला सातत्य राखावे लागणार आहे.
पहिला दिवस :₹1.15 कोटी
दुसरा दिवस : ₹1.85 कोटी
तिसरा दिवस : ₹2.50 कोटी
चौथा दिवस : ₹1.15 कोटी
पाचवा दिवस : ₹1.65 कोटी
सहावा दिवस : ₹1.75 कोटी
सातवा दिवस : ₹2.20 कोटी
आठवा दिवस : ₹1.90 कोटी
नववा दिवस : ₹4.35 कोटी
दरम्यान, हॉन्टेड 3D: इकोज ऑफ द पास्ट या चित्रपटाची कमाई दुसऱ्या आठवड्यात मंदावलेली दिसत आहे. विक्रम भट्ट दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच 15 कोटींचे बजेट वसूल केले. मात्र आता कमाई लाखांवर अडकली आहे.
होमी अदजानिया दिग्दर्शित ‘कॉकटेल 2’ला प्रदर्शित होताना या चित्रपटाला तब्बल 10,835 शो मिळाले होते. त्यामुळे इतर चित्रपटांचे शो कमी करण्यात आले. तरीही ‘मैं वापस आऊंगा’ला नवव्या दिवशी 1,372 शो मिळाले, तर ‘हॉन्टेड 3D’ला 1,157 शो मिळाले.