डॉक्टरलाच झाला इंजेक्शनचा ओव्हरडोस? प्रसिद्ध डॉक्टर केबिनमध्ये मृतावस्थेत; नागपूरमध्ये खळबळ
Tv9 Marathi June 23, 2026 02:45 PM

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या प्रसिद्ध न्यूरॉन रुग्णालयात डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांचा त्यांच्या कक्षातच संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. डॉ. चांदेवार यांच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी धंतोली पोलीस स्टेशमनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. मात्र डॉक्टर चांदेवार यांच्या अकस्मिक मृत्यमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त असून शोककळा पसरली आहे. दरम्यान त्यांच्या केबिनमध्ये काही इंजेक्शन्स आढळल्याने विविध शंका उपस्थित होत आहेत.

काम आटोपून विश्रांतीसाठी गेले ते उठलेच नाहीत

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. चांदेकर आयुर्वेदिक डॉक्टर होते. नागपूरमधील प्रसिद्ध न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये ते वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. काल सकाळी ते हॉस्पिटलमध्ये आले. त्यांची नियमित काम त्यांनी आटोपली, रुग्ण तपासून वगैरे झाल्यावर, सर्व कामं पूर्ण झाल्यावर ते त्यांच्या कक्षात विश्रांतीसाठी गेले.

मात्र बराच वेळ झाल्यानंतरही ते बाहेर आले नाहीत. त्यांच्या सहकाऱ्यांनी केबिनचा दरवाजा वाजवाल. पण कोणीच प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ होऊनही डॉक्टरांनी दरवाजा न उघडल्याने सहकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना या घटनेची सूचना दिली

केबिनमध्ये सापडली इंजेक्शन्स

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी न्यूरॉन हॉस्पिटलं गाठलं आणि जोर लावून अखेर डॉक्टरांच्या केबिनंच दार उघडलं, मात्र समोरचं दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला, त्यांचे डोळेच विस्फारले. केबिनमध्ये डॉक्टर ईश्वरचंद्र चांदेवार हे बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्याचवेळी मृत डॉक्टरच्या कक्षात काही इंजेक्शन्स आढळली. त्या इंजेक्शन्सचा ओव्हरडोस झाल्यामुळेच डॉ. चांदेवार यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.

याप्रकरणी सध्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास, चौकशी सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.