देशातील सर्वोच्च नागरी सन्मान समजल्या जाणाऱ्या 'पद्म पुरस्कारांचे' (Padma Awards) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. हा पुरस्कार वितरण समारंभ राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक ‘गणतंत्र मंडप’ येथे अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. या राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल 'पद्म' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
या भव्य समारंभास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसह अनेक केंद्रीय मंत्री आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. द्म पुरस्कार वितरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील एकूण 65 मान्यवरांना (2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री) पुरस्कार प्रदान करण्यात आलेत.
अलका याज्ञिक - यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रोहित शर्मा - यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. आर्मिडा फर्नांडिस - यांना ‘वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री प्रदान करण्यात आला.
भिकल्या लाडक्या धिंडा - यांना क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील 'या' 6 दिग्गजांना 'पद्मश्री'क्रीडा, कला, संगीत, चित्रपट, वैद्यकीय आणि उद्योग क्षेत्रात राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या ६ मान्यवरांना 'पद्मश्री' (Padma Shri) पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आर. माधवन कला (चित्रपट) - 'थ्री इडियट्स', 'विक्रम वेधा' सारख्या चित्रपटांतील अभिनय आणि 'रॉकेट्री' चित्रपटाच्या सर्वोत्तम दिग्दर्शनासाठी गौरव करण्यात आला.
डॉ. आर्मिडा फर्नांडिस - वैद्यकीय क्षेत्र भारतातील नवजात शिशुवैद्यकशास्त्राच्या अग्रणी तज्ज्ञ.
भिकल्या लाडक्या धिंडा - कला (लोकसंगीत) वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे ८९ वर्षीय तारपावादक.
अशोक खाडे - उद्योग क्षेत्र- माझगाव डॉकमधून सुरुवात करत १९९२ मध्ये 'दास ऑफशोअर' या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपनीची स्थापना केली.
सतीश शाह (मरणोत्तर) - कला (अभिनेते) चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमीवर ४ दशकांहून अधिक काळ योगदान.