गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांना प्रत्येक महिन्याला मिळणार 10 हजार रुपये, 'या' सरकारचा मोठा निर्णय   
एबीपी माझा वेब टीम June 24, 2026 10:13 PM

Punjab Govt : पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टपासून पंजाबमधील प्रत्येक सरपंचांना  महिन्याला 10 हजार रुपयांचा पगार मिळणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज यासंदर्भातील घोषणा केली आहे. याबाबत बोलताना मान म्हणाले की, सरपंच रात्रंदिवस गावकऱ्यांची सेवा करतात आणि ते पगारास पात्र आहेत. 'आप' सरकार लोकांच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे भगवंत मान यांनी सांगितले.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल दिलेल्या माहितीनुसार, आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ऑगस्टपासून प्रत्येक सरपंचाला दरमहा 10 हजार रुपये पगार मिळणार आहे. सरपंच हे पंचायत लोकशाहीतील पहिला दुवा आहेत. ते रात्रंदिवस गावाची सेवा करतात. ते पगारास पात्र असल्याची माहिती भगवंत मान यांनी दिली आहे. 

गावे समृद्ध झाली तर पंजाब समृद्ध होईल - भगवंत मान

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, आता सरपंच आपल्या कुटुंबासोबत सुखाने जगू शकतील आणि आपल्या गावांचा अधिक वेगाने विकास करू शकतील. गावे समृद्ध झाली तर पंजाब समृद्ध होईल. आम्ही जनतेसाठी काम करत राहू. हे आमचे वचन असल्याचे मान म्हणाले. 

अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या सरपंचांचे केले अभिनंदन 

अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या सरपंचांचे अभिनंदन केले. दरम्यान, भगवंत मान सरकारच्या निर्णयाचे कौतुक करत, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सरपंचांचे अभिनंदन केले. एका एक्स-पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, "पंजाबच्या सर्व सरपंचांचे मनःपूर्वक अभिनंदन. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे जो केवळ आम आदमी पक्षच घेऊ शकला. देशात पहिल्यांदाच सरपंचांना असे वेतन मिळणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल भगवंत मान साहेबांचे अभिनंदन.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.