उद्धव ठाकरे गटाला कोल्हापुरातून आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला.
जिल्हाप्रमुख रविकरण इंगवले यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
पक्षातील अंतर्गत वाद आणि मतभेद हे राजीनाम्याचे प्रमुख कारण मानले जात आहे.
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसलाय. एकीकडे खासदारांनी पक्ष सोडला दुसऱ्या बाजुला पक्षातील अंतर्गत वाद पिछा सोडत नाहीये. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अंतर्गत वादाला कंटाळून एका नेत्यानं थेट आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. कोल्हापुरचे जिल्हाप्रमुख रविकरण इंगवले यांनी आपल्या पदाचा तडकापडकी राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षीच त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती. मात्र एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; कोकणातील बड्या नेत्याने मशाल घेतली हातीराजीनाम्याचे मुख्य कारण पक्षातील दोन गटांतील सातत्याने होणारा वाद आणि तक्रारी असल्याचे सांगण्यात येत आहे. इंगवले यांच्यानुसार त्यांना पक्षात कोणाचीही मदत मिळत नाहीये. यामुळे "आपण एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?" असा सवाल उपस्थित करत पदाचा राजीनामा दिलाय. इंगवले यांनी आपला राजीनामा पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवला असून, आता नवीन जिल्हाध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर पक्षात समन्वय नाहीयेदुसरीकडे पक्षात संजय पवार, विजय देवणे आणि रविकरण इंगवले यांसारखे ताकदीचे नेते असूनही त्यांच्यामध्ये समन्वयाचा नसल्याचं दिसून येत आहे. या नेत्यांमधील अंतर्गत वादामुळे पक्षाची एकूण ताकद कमी होतेय. पक्षाला कोल्हापूरमहापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत फारसे यश मिळालं नाही. महापालिकेतही त्यांचा एकमेव नगरसेवक निवडून आला होता. दुर्दैव म्हणजे या कमकुवत स्थितीनंतरही पक्षातील गटबाजी संपलेली नाहीये.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे शहर प्रमुख मंजित माने यांच्यासोबतची त्यांची कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. काही दिवसांपूर्वीच रविकिरण इंगवले यांनी कोल्हापूर शहरप्रमुख मंजित माने यांना फोनवरून धमकी दिली होती. दोघांत संभाषण झालेली खळबळजनक ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून, ठाकरे सेनेतीलवाद चव्हाट्यावर आला.