Protein-Rich Moong Makhana Chaat: रोजच्या बोरींग नाश्त्याला द्या ब्रेक! 10 मिनिटांत तयार करा हा प्रोटीनयुक्त मूग-मखाना चाट
esakal June 26, 2026 10:45 AM

Easy Morning Snack Packed with Nutrition: सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो, त्यामुळे त्यात चव आणि पोषण यांचा योग्य समतोल असणे आवश्यक आहे. हिरवा मूग, मखाना आणि शेंगदाणे वापरून बनवलेली ही पौष्टिक चाट प्रोटीन, तंतुमय घटक आणि उर्जेचा उत्कृष्ट स्रोत ठरते. काहीच मिनिटांत तयार होणारा हा नाश्ता तुम्हाला संपूर्ण दिवस ताजेतवाने आणि उत्साही राहण्यास मदत करू शकतो.

साहित्य
  • 150 ग्रॅम हिरवे मूग (हलके शिजवलेले)

  • भाजलेला मखाना

  • 1 मध्यम कांदा (बारीक चिरलेला)

  • भाजलेले पण मीठ नसलेले शेंगदाणे

Masala Methi Thepla: 15 मिनिटांत तयार करा मऊ, चवदार मसाला मेथी थेपला; नाश्ता आणि डब्यासाठी परफेक्ट रेसिपी
  • 3 टेबलस्पून तिखट मिरची मसाला

  • 1 टीस्पून चाट मसाला

  • कोथिंबीर (सजावटीसाठी)

  • कच्च्या कैरीचे तुकडे (ऐच्छिक)

  • 1 लिंबू

कृती
  • एका मोठ्या भांड्यात हलके शिजवलेले हिरवे मूग घ्या.

  • त्यात भाजलेला मखाना, चिरलेला कांदा आणि भाजलेले शेंगदाणे घाला.

  • आता तिखट मिरचीची चटणी आणि चाट मसाला घालून सर्व साहित्य नीट एकत्र करा.

  • वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कच्च्या कैरीचे तुकडे घाला.

  • शेवटी लिंबाचा रस पिळून सर्व मिश्रण चांगले हलवा.

  • ताजी आणि कुरकुरीत चाट लगेच सर्व्ह करा.

  • View this post on Instagram