ही तर सियापेक्षाही डेंजर निघाली, साखरपुड्यानंतर थेट बॉयफ्रेंडला..; अंगावर काटा आणणारी घटना!
Tv9 Marathi June 26, 2026 01:45 PM

सध्या देशभरात केतन अग्रवाल प्रकरणाची चर्चा आहे. केतनला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने लोहगडावरुन खोलं दरीत ढकलून दिलं. या घटनेत केतनचा मृत्यू झाला. सियाचं केतन बरोबर लग्न ठरलं होतं. हॉलपासून इतर गोष्टींची लग्नाची कामं सुरु होती. मात्र, त्याआधी सियाने प्रियकराच्या मदतीने केतनला संपवलं. आता राजस्थानच्या टोक जिल्ह्यात बिलकुल या उलट एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. केतन अग्रवाल आणि सिया गोयल सारखीच ही केस आहे. फक्त त्यात थोडा फरक आहे. इथे प्रेयसीला साखरपुडा झाल्यानंतर प्रियकरापासून सुटका करुन घ्यायची होती. त म्हणून तिने प्रियकराला मार्गातून हटवण्यासाठी गुंडांना सुपारी दिली. गुंडांची दहशत आणि मानसिक तणावामुळे अखेर जयपूरमधल्या या मुलाने आपल्या मामाच्या घरात आयुष्याचा शेवट केला. राजस्थानच्या जगदीश नगरमधील ही घटना आहे. पोलिसांनी मृताची ओळख पटवली असून त्याचं नाव मनोज नामा आहे.

मनोजचाभाऊ पंकज नामाने पोलीस आणि मीडियाशी बोलताना सांगितलं की, “मनोजचे दीर्घकाळापासून एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. अलीकडेच त्या युवतीचं दुसरीकडे लग्न ठरलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. घटनेच्या एक दिवस आधी सुद्धा दोघांमध्ये फोनवरुन जोरदार भांडणं झालं. मुलीकडून फसवणूक झाल्यामुळे मनोज मानसिक तणावाखाली होता”

त्यांना मनोजच्या मागे सोडलं होतं

मनोजपासून पाठलाग सोडवण्यासाठी मुलगी कुठल्याही पातळी पर्यंत जायला तयार होती असा नातेवाईकांनी गंभीर आरोप केला. मनोजला शारीरिक हानी पोहोचवण्यासाठी त्याला धमकावण्यासाठी तिने काही स्थानिक गुंडांना सुपारी दिली होती, असा नातेवाईकांचा आरोप आहे. त्यांना मनोजच्या मागे सोडलं होतं. गुंडांची हीच भिती आणि मानसिक दबावामुळे मनोज जयपूर सोडून टोकला निघून गेला.

म्हणून मामाच्या घरी आला

मनोज इथे लपण्यासाठी म्हणून मामाच्या घरी आला होता. या सुपारीबद्दल आणि त्याच्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल मनोजच्या कुटुंबाला त्याच्या एका मित्राकडून समजलं होतं. नातेवाईकांनी प्रेयसी आणि गुंडांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.