Cocktail 2 Box Office Collection: Homi Adajania दिग्दर्शित 'कॉकटेल 2'नं सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृति सेनन यांची मुख्य भूमिका आहे. हा रोमँटिक ड्रामा सिनेमा 19 जून रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांकडून मिक्स्ड रिव्ह्यू मिळत आहे. दरम्यान, मिक्स्ड रिव्ह्यू मिळत असले तरी, प्रेक्षकांनी या सिनेमाला पसंती दर्शवली आहे. ओपनिंग विकेंडला या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवला. परंतु, विकडेजमध्ये या सिनेमाच्या कमाईत चढ - उतार पाहायला मिळालं. फर्स्ट विकमध्ये या सिनेमानं नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
'कॉकटेल 2' नं सिनेमागृहांमध्ये आपला पहिला आठवडा पूर्ण केला आहे. पहिला आठवड्यात या सिनेमानं ठीकठाक कामगिरी केली आहे. विकडेजमध्ये या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या सिनेमानं पहिल्या आठवड्यात 70 कोटींचा आकडा गाठला आहे. काही दिवसांत हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, 'कॉकटेल 2' या सिनेमानं गुरुवारी भारतात 4.15 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. एका आठवड्यात या सिनेमानं एकूण 70 कोटींचे कलेक्शन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'कॉकटेल 2' या सिनेमानं ओपनिंग डेला 13.50 कोटींचे कलेक्शन केले होते. विकेंडला या सिनेमाच्या कमाईत जबरदस्त वाढ झाली होती. दरम्या, शनिवारी या सिनेमानं 6.25 कोटींचे कलेक्शन केले होते. तर, रविवारी या सिनेमानं 17.75 कोटींचे धमाकेदार कलेक्शन केले होते.
रविवारी धमाकेदार कमाई केल्यानंतर सोमवारी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी या सिनेमानं 6.75 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. तर, मंगळवारी या सिनेमानं 6.75 कोटी रुपयांची कमाई केली. तर, बुधवारी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी या सिनेमानं 5.25 कोटींचे कलेक्शन केले. 'कॉकटेल 2' या चित्रपटाने 'धुरंधर 2', 'बॉर्डर 2', आणि 'भूत बंगला' हे चित्रपट वगळता, या वर्षी प्रदर्शित झालेल्या 28 सिनेमांचे पहिल्या आठवड्यातील बॉक्स ऑफिस रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या: